पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार

सध्या राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना या दोन पक्षात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Pm Narendra Modi, Cm Uddhav Thackeray
Pm Narendra Modi, Cm Uddhav ThackeraySaam Tv

मुंबई: सध्या राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना (BJP) या दोन पक्षात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर राज्यसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. शिवसेनेने महागाईवरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर टीका केली, आता या पार्श्वभूमीवर उद्या सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करणार आहेत, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकाच मंचावर येणार आहेत.

काही दिवसापूर्वी, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला होता. या कार्यक्रमातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार होते, पण मुख्यमंत्री या कार्यक्रमाला गेले नाहीत.

Pm Narendra Modi, Cm Uddhav Thackeray
Bacchu Kadu | मी नाराज नाही, पण...; कडूंमुळे मविआला टेन्शन | Mahavikas Aghadi

जल भूषण इमारत, क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. जल भूषण इमारत ही १८८५ सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. या इमारतीचे आयुर्मान संपल्यामुळे ती पाडण्यात आली होती, आणि त्या जागी नव्या इमारतीच्या बांधकामाची मंजुरी देण्यात आली होती. भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्याहस्ते ऑगस्ट २०१९ मध्ये नव्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. जुन्या इमारतीची सर्व वैशिष्ट्ये नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत जतन करण्यात आली आहेत.

सन २०१६ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. २०१९ साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय आहे. हे संग्रहालय वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर बंधू, मॅडम भिकाजी कामा, व्ही. बी. गोगटे, 1946 मधील नौदल क्रांती आणि अन्य क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करते.

Pm Narendra Modi, Cm Uddhav Thackeray
राहुल गांधींची ईडी चौकशी; दिल्लीत काँग्रेस आक्रमक

पंतप्रधान (Pm Narendra Modi) मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. १ जुलै,१८२२ रोजी फरदुनजी मर्झबानजी यांच्या हस्ते मुंबई समाचारची एक साप्ताहिक म्हणून छपाई सुरु झाली. त्यानंतर १८३२ साली ते दैनिक झाले. हे वृत्तपत्र गेली २०० वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com