president police medal 2022 list saam tv
मुंबई/पुणे

अभिमानास्पद! राज्यातील तब्बल ८४ पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर; पाहा ही यादी

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रविवारी राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या तब्बल ८४ पोलीस जवानांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली आहेत.

Vishal Gangurde

सूरज सावंत

मुंबई : राज्याच्या पोलीस दलात कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडून शौर्य पदक देऊन सन्मानित केले जाते. याच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रविवारी राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या तब्बल ८४ पोलीस जवानांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली आहेत. तसेच राज्य पोलीस (Police) दलामध्ये कार्यरत असलेल्या ४२ पोलिसांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच पोलीस दलात उत्कृष्ट सेवेसाठी ०३ आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ जणांना सन्मानित करण्यात आले आहे. (president police medal 2022 News)

पोलीस दलात उत्कृष्ट सेवेसाठी राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त सुनील कोल्हे, ठाणे शहरच्या वायरलेस विभागातील सहायक पोलीस आयुक्त प्रदिप कन्नालू आणि ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

पोलीस दलात शाैर्यपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल माहूरदार परांजने, राजरत्न खैरनार, राजू कांडो, अविनाश कुमरे, गोंगलू टिम्मा, संदीप भांड, मोतीराम माडवी, दामोदर चिंतुरी, राजकुमार भालावी, सागर मूल्लेवार, शंकर माडवी, रमेश असम, महेश सयम, साईकृपा मिरकुटे, रत्नाय्या गोरगुंडा, मनीष कलवानिया, भाऊसाहेब ढोले, संदीप मंडलिक, मोतिराम माडवी, दयानंद महाडेश्वर, जीवन उसेंडी, राजेंद्र माडवी, विलास पाडा, मनोज इसकापे, समीर शेख, मनोज गजमवार, अशोक माजी, देवेंद्र पखमोडे, हर्षल जाधव, स्वर्गीय जगदेव मांडवी, सेवाक्रम माडवी, सुभाष गोंगले, रोहित गोंगले, योगीराज जाधव, धनाजी होनमाने, दसरू कुरसामी, दीपक विडपी, सुरज गंजीवार, दिवंगत किशोर अत्राम, गजानन अत्राम, योगेश्वर सदमेक आणि अंकुश खंडाळे यांचा समावेश आहे.

पोलीस दलात गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सीआयडी औरंगाबाद येथील पोलीस उपअधिक्षक सुभाष निकम आणि पोलीस उपअधिक्षक आप्पासाहेब शेवाळे यांच्यासह पोलीस निरीक्षक संतोष जोशी, भानुदास खटावकर, अशोक भगत, नितीन पोतदार, व्यंकट केंद्रे, श्रीकांत अदाटे आणि सहायक कमांडंट दिलीप तावरे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र कोळी, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुवेस्कर, शंकर गावकर, देविदास बंड, कृष्णा हिसवणकर, सुर्यकांत आनंदे, प्रदिप चांदेलकर, वाल्कीम मंधरे, सुनील अंबार्ते, माणिक गायकर, जमालुद्दीन जहागीरदार, विलास जामनेकर, अविनाश अक्कावार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र मोहिते, माणिक सपकाळे, विजय गेडम, प्रमोद ढोरे, प्रवीण बेजलवार, गुलाम गलकटू, धनराज तळेकर, अशोक राणे, संतोष वाजुरकर, भास्कर वानखेडे, प्रदीप चिरमाडे, सुरेश कदम, विजय पाटील, सुनील गीत, हवालदार राजेंद्र शिर्के, सुरेश पाटील आणि गुप्तचर अधिकारी अशोक भोंडवे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT