pravin darekar criticizes uddhav thackeray on eve of lok sabha election 2024  Saam TV
मुंबई/पुणे

Lok Sabha Election 2024 : भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाहीत; प्रविण दरेकर यांचा उद्धव ठाकरेंना टाेला (पाहा व्हिडिओ)

Pravin Darekar : अडीच वर्षांच्या कालावधीत कायकाय कांड केलेत, सत्तेचा दुरुपयोग करून भाजप नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलात असा आराेप दरेकरांना ठाकरेंवर केला.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Raigad :

आगामी काळात हाेणा-या लाेकसभा निवडणुकीसाठी (lok sabha election 2024) राज्यातील सर्वच पक्ष माेर्चेबांधणी करु लागले आहेत. भारतीय जनता पक्ष यंदाच्या निवडणुकीत 400 जागांपेक्षा जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे पंतप्रधान नरेंद्र माेदी (pm narendra modi) यांच्यावर टीका करीत आहे. त्यावर आमदार प्रवीण दरेकर (praveen darekar) यांनी ठाकरेंना टाेला लगावला आहे. पंतप्रधान मोदींवर खालच्या पातळीवर टिका कराल तर जनतेचा रोष तुमच्यावर वाढेल आणि मोदींचं समर्थन घट्ट होईल असे दरेकर यांनी ठाकरेंना सुनावले आहे. (Maharashtra News)

उद्धव ठाकरे रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना भेटत नाहीत म्हणून तर त्यांचा पक्ष रस्त्यावर आला. बाळासाहेबांनी (balasaheb thackeray) कष्टाने उभी केलेली शिवसेना त्यांना टिकवता आली नसल्याची बोचरी टिका प्रवीण दरेकर यांनी रायगड येथे उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

उद्धव ठाकरे भाजप कार्यकर्त्यांना अंधभक्त म्हणतात यावर बोलताना दरेकर म्हणाले बाळासाहेबांवर लोकांची श्रद्ध होती तशीच मोदींवर आहे. अंधभक्त, अंधश्रध्दा आणि श्रध्दा यातला फरक उद्धव ठाकरे यांना समजत नसल्याचेही दरेकर यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अडीच वर्षांच्या कालावधीत कायकाय कांड केलेत, सत्तेचा दुरुपयोग करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलात हे महाराष्ट्राला माहिती आहे याची जाणीव दरेकर यांनी ठाकरेंना करून दिली.

मोदींवर खालच्या पातळीवर टिका कराल तर जनतेचा रोष तुमच्यावर वाढेल आणि मोदींच समर्थन घट्ट होईल असे दरेकर यांनी ठाकरेंना सांगितले आहे. पक्ष संघटन मजबुत करा, आलेल्या निवडणुकांना सामोरे जा, चार शिव्या घालून, भावनिक होऊन तुम्हाला तग धरता येणार नाही असेही दरेकर यांनी ठाकरेंवर टीका करताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT