आर्यन खानला वाचविण्यासाठी शिवसेना कोर्टात जाते याचा अर्थ काय? - प्रवीण दरेकर
आर्यन खानला वाचविण्यासाठी शिवसेना कोर्टात जाते याचा अर्थ काय? - प्रवीण दरेकर SaamTV
मुंबई/पुणे

आर्यन खानला वाचविण्यासाठी शिवसेना कोर्टात जाते याचा अर्थ काय? - प्रवीण दरेकर

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : कोरोना काळात (Corona Period) इतर राज्यांनी पॅकेज जाहीर केली या सरकारने का केलं नाही? कोरोनापासून शेतकरी दबला जात आहे. लोकशाहीत कोणी ही कोणावर आरोप करत असतो. शिवसेना ही ड्रग्ज (Drugs) च्या विरोधात आहेत की वाढवत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते कोर्टात जावून, सेना ड्रग्ज च्या बाजूने आहे हे दाखवत आहे. तसेच आर्यन खानला Aryan Khan वाचविण्यासाठी शिवसेना कोर्टात Court जाते याचा अर्थ काय ? असे प्रश्न उपस्थित करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवरती टीकास्त्र सोडले आहे. (Praveen Darekar's question is what does it mean that Shiv Sena went to court to save Aryan Khan)

हे देखील पहा -

दरेकर म्हणाले 'केंद्र आणि राज्य सरकारने मिळून सहकार वाढीचे धोरण ठरवावे. केवळ कारखादारांची बाजू घेऊन चालणार नाही. अमित शहा यांनी सहकाराचा अभ्यास आहे. राज्यातील सहकार चळवळीला नक्की चालना मिळेल, देवेंद्र फडणवीस अमित शहांची (Devendra Fadnavis, Amit Shaha) यासाठीच भेट घेत असल्याचही दरेकरांनी सांगितलं. तसेच महागाई बाबत भाजपने अनेकवेळी भूमिका जाहीर केली आहे. पेट्रोल डिझेल वर आमचे सरकार असतांना सूट दिली होती. राज्यसरकार आपला टॅक्स कमी न करता केवळ केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्यसरकार विरोधात आंदोलन करावे लागेल. केंद्र भूमिका ही देशपातळीवर असते. केंद्र सरकार महाराष्ट्रासाठी जे करायचे ते नक्की करेल. भाज्या दरवाढीचा केंद्र सरकार जबाबदार आहे का? असा टोला त्यांनी आघाडी सरकारला लगावला.

एक्शन ला रिएक्शन असतेच -

हिंदुत्व Hindutva हे सोयीचं हत्यार नाही. पाहिजे तेव्हा बाहेर काढायचे शिवसेनेची अडचण झाली आहे. शिवसेनेचा हिंदुत्वाचा बेस टिकवायचा कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी Congres, NCP सोबत कसे हिंदुत्व घेऊन जायचे हा प्रश्न उभा राहिला आहे. अनंत गीते, रामदास कदम (Anant Gite, Ramdas Kadam) काय म्हणतात हे ही शिवसेनेने बघावे रामदास कदम यांनी बाळासाहेब असतात शिवसेना जपली तसेच एक्शन ला रिएक्शन असते तरुण भारत Tarun Bharat ने आपली भूमिका मांडली आहे गांजा ची प्रतवारी हे संजय राऊत सांगू शकतात असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.

शिवसेनेत काही उपऱ्यांना स्थान द्यायचे असेल म्हणून काही प्रयत्न करत आहेत. शिवसेनेत किती उपरे आहेत हे ही पाहावे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवर कोणी बोलत नाहीत. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत असा आरोप दरेकरांनी केला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

SCROLL FOR NEXT