ऐन दिवाळीच्या तोंडावर आयुक्तांचा फटाकेबंदीचा निर्णय ! (पहा व्हिडीओ)

फटाके व्यवसायात व्यावसायिकांचे लाखो-करोडो रुपये अडकले आहेत.
ऐन दिवाळीच्या तोंडावर आयुक्तांचा फटाकेबंदीचा निर्णय ! (पहा व्हिडीओ)
ऐन दिवाळीच्या तोंडावर आयुक्तांचा फटाकेबंदीचा निर्णय ! (पहा व्हिडीओ)SaamTv
Published On

नाशिक : दिवाळी Diwali म्हटलं की विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी हे समीकरणच आहे. मात्र फटाके Firecrackers वाजवू नका किंवा कमी प्रदुषण Pollution होणारे फटाके फोडा असा सल्ला सरकारसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून दरवर्षी देण्यात येतो. मात्र आता दिवाळी ऐन तोंडावरती य़ेवून ठेपली असतानाच नाशिक Nashik मध्ये फटाक्यांवरती बंदीचा आदेश काढल्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये संतापाच वातापरण आहे. (Commissioner's decision to ban firecrackers)

पहा व्हिडीओ -

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदीचा निर्णय विभागिय आयुक्तांनी घेतला असून त्याबाबतचे आदेश स्थानिक प्रशासनांना देण्यात आले आहेत. मात्र दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती येवून ठेपली असून सर्व फटाके व्यापाऱ्यांनी (Firecracker Merchants) फटाक्यांमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावरती फटाके विक्री आणि वाजवण्यावरती बंदी घातल्याने व्यापाऱ्यांमध्ये संताप पहायला मिळत आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर आयुक्तांचा फटाकेबंदीचा निर्णय ! (पहा व्हिडीओ)
गॅस दरवाढीचा पुन्हा भडका; जाणून घ्या नवे दर काय?

बंदी न उठवल्यास हायकोर्टात जाणार

नाशिकच्या फटाके व्यापारी असोसिएशनचा इशारा नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील फटाके बंदीला फटाके व्यापारी असोसिएशननं विरोध केला आहे. फटाके व्यवसायात व्यावसायिकांचे लाखो-करोडो रुपये अडकले असून लाखो जणांची उपजीविका यावर अवलंबून आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर फटाके बंदी करणं हा व्यावसायिकांवर अन्याय असल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे. त्यामुळे फटाके बंदी न उठवल्यास या विरोधात हायकोर्टात High Court लढाई लढू, मात्र फटाके बंदी होऊ देणार नाही, असा इशारा फटाके व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com