Pratap Sarnaik Statement on Mumbais Language x
मुंबई/पुणे

Pratap Sarnaik : भैयांच्या मतांसाठी 'मुंबईची बोलीभाषा हिंदी', शिंदेंच्या मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

Pratap Sarnaik Statement on Hindi Language : महापालिका निवडणुक तोंडावर आली आणि भैय्यांच्या मतांसाठी मराठीला दुय्यम स्थान दिलं...प्रताप सरनाईक नेमकांनी काय विधान केलंय? आणि विरोधकांनी कसा हल्लाबोल केलाय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Yash Shirke

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक... भैय्यांच्या मतांसाठी यांनी तर हद्दच पार केलीय...मुंबईची बोलीभाषा मराठी नाही तर हिंदी असल्याचं संतापजनक वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईकांनी केलंय..

प्रताप सरनाईक हे मराठीच्या मुद्द्यावर सुरु झालेल्या शिवसेना पक्षाचे मंत्री आहेत.. त्यांनी उत्तर भारतीयांच्या मतांसाठी मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केलाय.. त्यामुळे विरोधकांनी सरनाईकांवर जोरदार हल्लाबोल केलाय..

सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले.. त्यानंतर सर्वच पक्ष निवडणुकीसाठी कामाला लागलेत.. त्यातच मुंबई महानगर परिसरात 8 महापालिका आहेत.. यामध्ये मीरा भाईंदर आणि वसई विरार भागात उत्तर भारतीय मतांची संख्या जवळपास 35 टक्के आहे.. त्यामुळे या मतांचं गणित जुळवण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईकांनी हिंदी भाषिकांपुढे हुजरेगिरी सुरु केलीय.. खरंतर मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालाय.. त्यामुळे मराठीच्या प्रसारासाठी काम करण्याऐवजी मंत्रीच भैय्यांच्या मतांसाठी मराठी अस्मितेला लाथाडत असतील तर त्याचं उत्तर मराठी मतदारांनी मतपेटीतून द्यायला हवं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT