'राज्यातील भाजप-शिवसेनेचे भ्रष्टाचार, हत्यांचे आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर; मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे' Saam TV
मुंबई/पुणे

'राज्यातील भाजप-शिवसेनेचे भ्रष्टाचार, हत्यांचे आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर; मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे'

'महाराष्ट्रात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर असून ते आता फक्त आर्थिक गैरव्यवहारांचे राहिले नसून त्यामध्ये आता अनेक हत्यांचे आरोप होत आहेत.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाचा (BJP And Shivsena) चांगलाच वादंग सुरु आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींसह अन्य नेत्यांवरती गंभीर आरोप केले आहेत तर शिवसेनेकडून संजय राऊतांनी (Sanjay Raut) सोमय्यांवरती आरोप केले आहेत तसेच अनेक मंत्री तुरुंगात जाणार असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे. आणि राज्यात चालु असलेल्या या सर्व आऱोप प्रत्यारोपाबाबत आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकरांशी बोलतांना केले आहे.

ते म्हणाले,'महाराष्ट्रात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर असून ते आता फक्त आर्थिक गैरव्यवहारांचे राहिले नसून त्यामध्ये आता अनेक हत्यांचे आरोप होत आहेत. हत्यांच्या आरोपांविषयी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने किंवा गृहमंत्र्यांनी वक्तव्य देऊन चालणार नाही. त्यामुळे या प्रकरणावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मौन सोडून वक्तव्य करावे. आणि आता तरी सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणावी असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT