Pradeep Purnekar’s niece receives death threat in Thane saam tv
मुंबई/पुणे

Next नंबर तुझा...; मेसेज करून प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला जीवे मारण्याची धमकी, ठाण्यात मोठी खळबळ

Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या पुतणी खुशबू पूर्णेकर यांना मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी देणारे मेसेज आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे ठाण्यात खळबळ उडाली असून पूर्णेकर कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Bharat Jadhav

विकास काटे, साम प्रतिनिधी

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर एकीकडे त्यांच्या कुटुंबीयांकडून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जातेय. याप्रकरणी आणखी काही आरोपींच्या अटकेचीही मागणी केली जातेय. याच दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या पुतणीला धमकीचा मेसेज आल्याने खळबळ उडालीय. खुशबू पुर्णेकरला मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. "तुझा नेक्स्ट गेम" असा आशयाचे मेसेज पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे, पूर्णेकर कुटुंबीय भीतीच्या छायेत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णेकर कुटुंबीयांशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. एकीकडे पीडित कुटुंबीयांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासन आणि मंत्र्यांनी दिलंय. मात्र, दुसरीकडे प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज मोबाईलवर आल्याने कुटुंबीय दहशती खाली आलेत. त्याच पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली जातेय.

आज शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईकांनी पूर्णेकर कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी पूर्णेकरांच्या पुतणीने धक्कादायक माहिती दिली. मला मोबाईलवर धमकीचा मेसेज आलाय. Next तू,.... असे मेसेज येत असल्याचं खुशबू पूर्णेकर म्हणाली. माध्यमांना प्रतिक्रिया देताना खूशबू म्हणाल्या की, आम्ही पोलीस संरक्षणाची मागणी केली आहेच.

सर्वजण म्हणतात की, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, परंतु पाठीशी असल्याचं हे तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा आरोपींना अटक केली जाईल. ते आताही मोकळेपणाने फिरत आहेत. धमकीचे मेसेज दाखवल्यानंतर प्रताप सरनाईकांनी तात्काळ पूर्णेकर परिवाराला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिलेत. ⁠घराबाहेर २४ तास सुरक्षा देण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

प्रताप सरनाईक पूर्णेकर कुटुंबियांना म्हणाले की, जो कोणी मुख्य आरोपी असेल त्यांन पाठीशी घालणार नाही. तुम्हाला मोठ्यातला मोठा वकील देईल . ⁠एकनाथ शिंदे यांची अनुमती घेऊनच मी भेटीला आलोय. त्यांचा तुम्हाला पाठिंबा असून त्यांच्या विषयी गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. शिंदे साहेब पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहेत.

येथील ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख असलेल्या प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने ठाण्यासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात राजकीय वॉरही पेटलं असून या हत्याकांडानंतर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही पूर्णेकर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं.

तर, नुकतेच पूर्णेकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी असलेल्या मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येसंदर्भात आरोप होत असून चौकशी देखील सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पूर्णकर कुटुंबीयांनी भेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

21 BJP-RSS कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता; 12 वर्षांनंतर कोर्टाचा निकाल, नेमकं काय घडलं?

Womens Fashion : स्टाइल आणि क्लासचा परफेक्ट मेळ! सण, ऑफिस आणि रोजच्या वापरासाठी हँडबैग्सच्या खास ट्रेंडिंग डिझाइन्स

Pension Rules : रिटायरमेंटच्या 4 वर्षे आधीच वेतन-पेन्शनची तपासणी! केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: जोगेश्वरी पूर्वेत मातीने भरलेला डंपर बेस्ट बसवर कलंडला; महिला प्रवासी जखमी

Thane Crime : वर्गमित्रांनीच केला घात; संध्याकाळच्या वेळेला घराबाहेर बोलावलं, निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक कारण उघड

SCROLL FOR NEXT