Pune: पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित

पिंपरी चिंचवड शहरात बहुतांश ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आले आहे

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : लोणीकंद ते चाकण दरम्यानच्या महापारेषणच्या विद्युत पुरवठ्यात (Power supply) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज पहाटेपासून पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात बहुतांश ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आले आहे. यामुळे पुणे शहरात पेठांचा भाग आणि सिंहगड (Sinhagad) रस्ता भागातील पाणीपुरवठा (Water supply) विस्कळीत झाला आहे. लोणीकंद (Lonikand) ते चाकण (Chakan) दरम्यान महापारेषणाती मोठी वीज वाहिनी आहे. यामध्ये बिघाड झाल्याने पहाटेपासून वीज बंद आहे. (Power outage Pune Pimpri Chinchwad city rural areas)

हे देखील पहा-

पुढील काही तासात वीज पुरवठा सुरळीत होणार आहे, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्याने पुण्यात हडपसर, कोंढवा, कात्रज, धायरी, स्वारगेट, बाणेर, कोथरूड शिवाजीनगर रस्ता रोड फाटा रोड आजचा भाग वडगाव शेरी चंदन नगर टिंगरे नगर येरवडा याबरोबरच सर्व भागातील वीजपुरवठा पहाटेपासून खंडित करण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील पहाटेपासून वीज गेली आहे. पहाटेपासून वीज नसल्याने ऑफिसला जाणार्‍या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

सोसायटीतील टाक्या नवीन पाने चढवणे शक्य नसल्याने अनेकांची अडचण झाली आहे. पुणे महापालिकेचा वडगाव केंद्रातील पंपींग चे काम विजेअभावी ठप्प झाली. त्यामुळे सिंहगड रस्ता भाग कात्रज सकाळी भाग येथे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच पेठांमधील कमी दाबाने पाणी येते तेथे मोटारीने पाणी सोडावे लागत आहे, पण पहाटेपासून वीज नसल्याने या भागातील पाण्याची अडचण निर्माण झाली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यावेळी दिली आहे.

विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने पिंपरी चिंचवड मधील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महापारेषणच्या लोणीकंद आणि चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३० च्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला आहे. यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी आणि चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी ६ वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT