Electricity
Electricity  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Load Shedding News : उकाड्यात पुणेकरांना लोड शेडिंगचा झटका? या भागात वीजपुरवठा 1-2 तास बंद राहण्याची शक्यता

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News: वाढती उष्णता आणि उकाड्यामुळे हैरान नागरिक पावसाची प्रतीक्षा करत आहेत. राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना भयंकर गर्मीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे ही स्थिती असताना पुणेकरांना या उकाड्यात लोड शेडिंगचा सामना करावा लागू शकतो.

वाढत्या विजेच्या मागणीमुळे पुण्यात 1 ते 2 तास लोड शेडिंग केली जाण्याची शक्यता आहे. विजेची मागणी वाढल्यामुळे महापारेषणचे लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये अतिरिक्त वीजभार निर्माण झाला आहे.

यामुळे लोणीकंद उपकेंद्र अतिभारित होण्याचा व संपूर्ण उपकेंद्र बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी महापारेषणच्या काही १३२ व २२० केव्ही क्षमतेच्या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्याचा विचार आहे. (Latest Political News)

या भागात लोड शेडिंगची शक्यता

पुणे शहरातील नगररोड, खराडी, लोहगाव, वडगाव शेरी, येरवडा आदींसह चिंचवड गाव, भोसरी एमआयडीसी व गावठाण, दिघी, लोणीकंद, थेऊर, उरळीकांचन आणि चाकणमधील काही भागात सोमवारी दुपारी एक ते दोन तासांसाठी विजेचे भारनियमन केले जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी गावठी उपाय; आठवडाभरात व्हाल स्लिम-ड्रिम

Today's Marathi News Live : PM नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर १५ मे रोजी पिंपळगाव बसवंत- जोपुळे रस्ता असणार बंद

Mumbai Local News : कल्याणच्या पुढे १५ डब्याची लोकल सेवा कधी धावणार? रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली मोठी अपडेट

PM Modi Gets Emotional: आईच्या निधनानंतर...,गंगा नदीकाठावर पूजेनंतर PM मोदींच्या डोळ्यांत पाणी!

Special Report : Kal Maharashtra | वकील बाजी मारणार की प्रध्यापक भाकरी फिरवणार? असं आहे उत्तर मध्य मुंबई मतदासंघाचं गणित

SCROLL FOR NEXT