ऑनलाईन लेक्चर सुरु असताना पॉर्न व्हिडीओ लावला; विलेपार्ले येथील धक्कादायक घटना ! SaamTv
मुंबई/पुणे

ऑनलाईन लेक्चर सुरु असताना पॉर्न व्हिडीओ लावला; विलेपार्ले येथील धक्कादायक घटना !

विलेपार्ले येथील एका नामांकित कॉलेजमध्ये ऑनलाईन लेक्चर सुरु असताना एका अज्ञात सायबर हॅकर्सने इंट्री घेत यंञणा हँक करून पॉर्न व्हिडीओ लावल्याची घटना उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरज सावंत

मुंबई : साकिनाका (Sakinaka) येथे खाजगी क्लास सुरु असताना सायबर बुलिंगसाठी अश्‍लील कृत्य केल्याप्रकरणी राजस्थानच्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच, विलेपार्ले (Vile Parle) येथील एका नामांकित कॉलेजमध्ये ऑनलाईन लेक्चर Lecture सुरु असताना एका अज्ञात सायबर हॅकर्सने इंट्री घेत यंञणा हँक करून पॉर्न व्हिडीओ लावल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेची महाविद्याल प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

हे देखील पहा -

याप्रकरणी कॉलेजच्या प्राध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरुन जूहू Juhu पोलिसांनी अज्ञात हॅकर्सविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. जुहू पोलिसांसह Police सायबर Cyber सेलचे अधिकारी संबंधित हॅकर्सचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सायबर बुलिंगसाठी काहीजण ऑनलाईन अश्‍लील कृत्य करणे, अश्‍लील संभाषण करणे, शिक्षकांना शिवीगाळ करणे असे प्रकार करीत आहे, केवळ मौजमजेसाठी असे प्रकार घडत असल्याचे काही प्रकरणातून उघडकीस आले आहे.

आधिच कोरोनाचा Corona वाढता प्रार्दुभाव पाहता शाळा, कॉलेज College आणि खाजगी क्लासेस Classes बंद आहे, त्यामुळे त्यांनी ऑनलाईन Online शिक्षणावर Educationअधिक भर दिला जात आहे. मात्र अश्या घटनांमुळे ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये Systemसावधानता व सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेंगदाणे सालीसकट खावेत की साल काढून? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर

Maharashtra News Live Update: अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील सफाई कामगार आक्रमक

Satara Earthquake: साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, घाबरून नागरिक घराबाहेर पळाले

Heart blockage percentage: रिपोर्टमध्ये 70-80% ब्लॉकेज दिसले म्हणजे हार्ट अटॅक येणार? हृदयात किती टक्के ब्लॉकेज धोकादायक?

Mumbai : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात ३४५ दिवस पुरेल इतकेच पाणी, कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT