जम्मू : जम्मू Jammu विमानतळाच्या Airport तांत्रिक विभागात मध्यरात्री मोठा स्फोट Blast झाल्याची घटना घडली आहे. भारतीय हवाई दलामार्फत चालवण्यात येणाऱ्या सतवारी हवाई दल स्टेशनवर हा स्फोट झाला आहे. रात्री उशिरा या स्फोटाचा आवाज झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच फॉरेंसिक टीम, बॉम्ब निकामी करणारे पथक, सैन्यदलातील अधिकारी, हवाईदलातील अधिकारी व पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. Big blast at Jammu airport
ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास जम्मू विमानतळ परिसरात स्फोटाचा आवाज ऐकू आला असून या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटाचा आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकू गेला.
जम्मूतील मुख्य विमानतळ आणि भारतीय हवाई दलाचं हेडक्वॉर्टर या स्फोट झालेल्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर आहे.त्यामुळे हा परिसर अतिसंवेदनशील मानला जातो. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे आवाज दूरपर्यंत ऐकू गेला आणि संपूर्ण परिसरात भीतीपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि एकच खळबळ उडाली. या स्फोटाचा प्राथमिक अहवाल सध्या हवाईदल तयार करत असून संपूर्ण प्रकार लवकरच समजून येईल.
दरम्यान विमानतळ स्फोटाची घटना घडली असतानाच जम्मूतून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. जम्मूतील नरवाल भागातून नदिम नावाच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळ ५ किलो आईडी (IED) आढळून आले आहे. सदर दहशतवाद्याचा आणि जम्मू विमानतळ स्फोटाचा काही संबंध याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.
By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.