Eknath Shinde vs uddhav thackeray group clash at shivaji park police will file case Saam TV
मुंबई/पुणे

Political News : ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच, चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Mumbai Political News : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या वादाप्रकरणी ठाकरे गटाच्या चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News :

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावर शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने आले होते. या प्रकरणी पोलिसांनी अनेक पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या वादाप्रकरणी ठाकरे गटाच्या चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभाग प्रमुख महेश सावंत यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. (Latest News Marathi)

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंसह इतरांवर डिलाई रोड ब्रिजचं अनधिकृत उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Nandurbar Crime: शिक्षकी पेशाला काळीमा! आश्रमशाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून बलात्कार

शरद पवारांना मोठा धक्का; पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा

Skin Care: थंडीत चेहरा काळा पडतोय? घरातला फक्त एक पदार्थ वापरा, चेहरा हिऱ्यासारखा चमकेल, गाल होतील मऊ-मऊ

New Year Special: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या घरी बनवा टेस्टी प्लम केक

SCROLL FOR NEXT