devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : 'मी अजून अर्धच बोललोय...' पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचं पुन्हा भाष्य

मी अजून अर्धाच बोललो आहे. उरलेलं योग्य वेळी बोलणार आहे.

Prachee kulkarni

मुंबई : अजित पवार यांच्यासोबतच्या पहाटेच्या शपथविधीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा भाष्य केलं आहे. मी बोललो ते सत्य बोललो आहे. मी अजून अर्धच बोललो आहे. योग्य वेळी सविस्तर बोलेन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मी जे बोललो त्याचे अनेक अर्थ काढले. मी काय बोललो ते नीट ऐका त्याच्या कडी जोडता येतील. मी अजून अर्धाच बोललो आहे. उरलेलं योग्य वेळी बोलणार आहे. (Latest Marathi News)

मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून निश्चितपणे अनेक प्रयत्न झाले. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला. पण अभिमन्यूकडून आपण अनेक गोष्टी शिकलो. चक्रव्यूह कसा तोडायचा हे आता माहित झालं आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवारांसोबत झालेल्या सकाळच्या शपथविधीविषयी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली होती. त्यांच्याशी चर्चा करूनच शपतविधी झाला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांणा उधाण आलं होतं.

23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु हे सरकार 72 तासांमध्येच कोसळलं होतं. त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकासआघाडी सरकार आलं. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आतापर्यंत स्पष्ट वक्तव्य केले नसली तरी फडणवीस यावर स्पष्टच बोललेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात DJ विरोधात आज ‘मूक मार्च’काढण्यात येणार

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

Rain Update : राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईसह २० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

SCROLL FOR NEXT