Political News : राष्ट्रवादीत मुख्यमंत्रिपदाचे २ दावेदार? आता जयंत पाटलांच्या 'भावी मुख्यमंत्री' पोस्टरमुळं चर्चेला उधाण

राष्ट्रवादीतून मुख्यमंत्री पदासाठी दोन बडे नेते शर्यतीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
jayant patil
jayant patilSaam Tv
Published On

मुंबई : महाविकास आघाडी आगामी निवडणुकीत आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कुणाला बनवणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर त्यांची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं दिसून येत आहे. आधी अजित पवार आणि जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घराबाहेर काही पोस्टर्स झळकले आहे. या पोस्टर्सवर जयंत पाटील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून मुख्यमंत्री पदासाठी दोन बडे नेते शर्यतीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.काही

jayant patil
Crime News : धक्कादायक! धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती, राजकीय वर्तुळात खळबळ

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाषणात अजितदादांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले होते. फक्त व्यासपीठावर न बोलता अजितदादांचं काम घराघरात पोहोचवाचं आहे. येत्या वर्षभरात करायचे आपल्याला हे करायचं आहे. कारण पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असं लंके यांनी म्हटलं होतं.

jayant patil
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची अकाेला कारागृहातून हाेणार सुटका; वाचा न्यायालयाचा आदेश

मात्र आधीच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या अजित पवारानंतर आता जयंत पाटलांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे. राज्यात आगामी निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त कोण शर्यतीत आहे, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र जयंत पाटलांच्या पोस्टर्समुळे नवीन दावेदार समोर आल्याचं समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com