Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची अकाेला कारागृहातून हाेणार सुटका; वाचा न्यायालयाचा आदेश

न्यायालयाने रविकांत तुपकर यांना आणि सहका-यांना 14 दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली हाेती.
Ravikant Tupkar, Buldhana Court, Akola Jail
Ravikant Tupkar, Buldhana Court, Akola Jailsaam tv
Published On

Ravikant Tupkar Bail Granted : आत्मदहन आंदाेलन छेडल्याप्रकरणी अकाेला (akola) कारागृहात न्यायालयीन काेठडीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkar sanghatana) संघटक रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांना आज न्यायालयात दिलासा मिळाला आहे. बुलढाणा न्यायालयाने (buldhana court) रविकांत तुपकरांसह सर्व आंदाेलकांना जामीन मंजुर केला आहे.

Ravikant Tupkar, Buldhana Court, Akola Jail
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला 'तो' पुतळा सापडला; असा झाला चोरीचा उलगडा

शेतकऱ्यांना (farmers) पिक विम्याची रक्कम पूर्ण मिळावी तसेच अतिवृष्टीत शेतीचे नुकसान झालेली रक्कम मिळावी यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविकांत तुपकरांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला हाेता. तुपकर यांनी हे आंदाेलन पाेलिसांच्या वेषात येऊन केले हाेते. त्यामुळे एकच गाेंधळ उडाला हाेती. त्यानंतर पाेलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले हाेते.

न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना 14 दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली हाेती. रविकांत तुपकर यांनां न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पाेलिसांनी त्यांची रवानगी अकाेला कारागृहात केली. तेथे देखील तुपकर यांनी त्यांचे अन्न त्याग आंदोलन सुरूच ठेवले. यामुळे तुपकारांची प्रकृती ढासळली अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी मंगळवारी साम टीव्हीला दिली.

Ravikant Tupkar, Buldhana Court, Akola Jail
APMC Market Vashi : आंब्याच्या पेट्या दाखल, एपीएमसीत आनंदाचे वातावरण; जाणून घ्या दर

आज बुलढाणा न्यायालयाने रविकांत तुपकर यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचा जामीन मंजूर केला आहे. तुपकर यांच्या पत्नी वकील शर्वरी यांनी साम टीव्हीला माहिती दिली. शर्वरी तुपकर म्हणाल्या या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश साने यांच्या न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली हाेती.

आज न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या आदेशामुळे रविकांत तुपकर आणि त्यांच्या समवेत असलेल्या सहका-यांची आज अकाेला कारागृहात सुटका हाेईल.

Ravikant Tupkar, Buldhana Court, Akola Jail
Valentine's Day 2023 : मै तेरा बॉयफ्रेंड तू मेरी गर्लफ्रेंड..., सूत जुळताच लैंगिक संबंध ठेवले अन् पुढं घडलं अघटित

दरम्यान रविकांत तुपकर यांच्या आत्मदहन आंदोलनानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविकांत तुपकरांविषयी बेताल वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत आज देऊळगावमहीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पुतळा जाळून निषेध नाेंदविला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com