Manasvi Choudhary
पावसाळ्यात ग्रामीण भागात आणि जंगलात अनेक प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात. या रानभाज्या केवळ चवीलाच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.
पावसाळ्यात आवर्जून खाल्ल्या जाणाऱ्या रानभाज्यापैंकी एक म्हणजे टाकळा भाजी. मात्र बाजारात इतर भाज्यांसोबत टाकळा भाजी ओळखणे कठीण असते यासाठी आज आम्ही तुम्हाला टाकळा भाजी कशी ओळखायची या विषयी सांगणार आहोत.
टाकळाची पानांवरून भाजी ओळखा. या भाजीच्या पानांचा रंग गडद हिरवा असतो. टाकळ्याच्या पानांच्या ३ जोड्या असतात.
टाकळाच्या रोपावर लहान, आकर्षक पिवळ्या रंगाची फुले येतात. फुले सुकून गेल्यानंतर त्यावर बारीक, दंडगोलाकार आणि लांबट शेंगा येतात
टाकळाची पाने हाताने चोळली किंवा तोडली, तर त्यातून एक वेगळा आणि विशिष्ट मातीचा किंवा सुवास येतो. हा वास टाकळा भाजी ओळखण्यासाठी सोपा आहे.
पावसाळ्यात टाकळा भाजी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच खरूज, नायटा या संसर्गजन्य रोगावर फायदेशीर आहे.