Sharad Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Political news : 'सुप्रिया सुळेंना हमासकडून लढण्यासाठी पाठवा'; शरद पवारांच्या इस्राइल-हमास युद्धाबाबतच्या वक्तव्यावरुन भाजप नेते आक्रमक

Hamas-Israel War : माझी शरद पवार यांना विनंती आहे की, केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करु नका, तर दहशतवादाचा तीव्र शब्दात धिक्कार करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

प्रविण वाकचौरे

Israel-Hamas War News :

स्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पॅलेस्टाईनबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजपने नेते त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मला वाटते शरद पवार साहेब सुप्रिया सुळे मॅडम यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील', असं वक्तव्य हिमंता बिस्वा सरमा यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

दहशतवादाविरुद्ध एकसंध राहणे आवश्यक- गडकरी

नितीन गडकरी यांनी म्हटलं की, शरद पवार यांनी केलेल्या बेजबाबदार विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमधील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सातत्याने सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात उभा राहिला आहे. इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केलेला तीव्र निषेध हे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठीच्या आपल्या अटल वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.

राष्ट्रहित आणि राष्ट्रीय सुरक्षेला राजकीय विचारांनी कधीही बाधा आणता कामा नये हे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे, असा खोचक सल्ला देताना गटकरी यांनी म्हटले, की राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्या राष्ट्रहिताचे रक्षण करताना एकता आणि सहमती असली पाहिजे. परिस्थितीच्या गंभीरतेमुळे राजकीय संबंध किंवा वैयक्तिक मतांची पर्वा न करता दहशतवादाविरुद्ध एकसंध राहणे आवश्यक आहे.

केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करु नका- फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. इस्त्रायल-पॅलेस्टाईन वादात भारताने आपली भूमिका कधीच बदलली नाही. मात्र, त्याचवेळी भारताने दहशतवाद, मग तो कुठल्याही स्वरुपात आणि कुणाच्याही विरोधात असो, त्याला कायमच कडाडून विरोध केला आहे.

इस्त्रायलमध्ये जेव्हा निष्पाप लोक मारले जातात, तेव्हा संपूर्ण जगाने त्याची कडाडून निंदा केली. तसाच निषेध भारतानेही केला. शरद पवार यांनीही तेच करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत. विशेषत: 26/11 च्या वेळी मुंबईने अनेक नागरिक गमावले. माझी शरद पवार यांना विनंती आहे की, केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करु नका, तर दहशतवादाचा तीव्र शब्दात धिक्कार करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

शरद पवार काय म्हणाले होते?

'आपण पॅलेस्टाईनच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. ती संपूर्ण जमीन पॅलेस्टाईनची आहे आणि इस्रायलने येऊन त्या जमिनीवर कब्जा केला आहे. त्यांची घरे ताब्यात घेतली. इस्त्रायली तिथे बाहेरचे आहेत आणि प्रत्यक्षात ही जमीन इस्रायलची नाही. या जमिनीच्या मालकीच्या लोकांच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: थोड्याच वेळात एकनाथ शिंदे राजभवानावर जाणार

Arjun Tendulkar: मुंबई इंडियन्सने सचिनचा मान राखला; Unsold अर्जुन तेंडुलकरला अखेरच्या ५ मिनिटांत 'इतक्या' रुपयांत घेतलं संघात

Viral Video: बापरे... भल्यामोठ्या टॉवरवर कामगारांचा रिल्स; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Aadhaar Card: मृत्यूनंतर Aadhaar Card, पॅन कार्डचे काय होणार? नियम वाचा

Maharashtra CM : शिंदेंसेनेचा विरोध, तरीही भाजप देवेंद्र फडणवीसांच्या फेवरमध्ये, लवकरच घोषणा होणार?

SCROLL FOR NEXT