हमास आणि इस्राइलच्या युद्ध अजून चिघळणार असल्याचं चिन्ह दिसत आहे. आज सकाळी गाझापट्टीमधील एका सरकारी रुग्णालयावर रॉकेट हल्लामुळे मोठी जीवितहानी झालीय. या हल्ल्यात ५०० पेक्षा जास्त निर्दोष लोकांचा मृत्यू झालाय. तर शेकडो जण जखमी झाले आहेत.
या हल्ल्यासाठी इस्राइलला जबाबदार ठरले जात आहे. परंतु इस्राइलने हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. हा हल्ला दहशतवादी इस्लामिक जिहाद संघटना जबाबदार असल्याचं इस्राइलने म्हटलंय. त्यामुळे आता सर्वांना प्रश्न पडतोय तो म्हणजे इस्राइल- हमासच्या युद्धात आता तिसरा प्लेअर कोण आहे? इस्राइलने जाहीर केलेल्या एका निवदेनात म्हटलं की, रुग्णालयात झालेल्या नरसंहारासाठी इस्राइलच जबाबदार आहे. परंतु बापिस्ट अरब नॅशनल रुग्णालयात इस्लामिक जिहादने हल्ला केलाय. इस्लामिक जिहादच्या अयशस्वी मिसाईल चाचणीमुळे हा हल्ला झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काय आहे इस्लामिक जिहाद
इस्लामिक जिहादही गाझापट्टीतील एक दहशतवादी संघटना आहे. ही इस्राइलविरोधात लढा देणारी एक कट्टरपंथीय संघटना आहे. या एक पॅलेस्टाईन इस्लामिक संघटना या नावानेही ओळखली जाते. या संघटनेमधील दहशतवाद्यांकडे आधुनिक शस्त्रे आहेत. ही संघटना १९७९ मध्ये इस्राइल विरुद्धात तयार करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात हे एक पॅलेस्टाईन विद्यार्थ्यांची गट होता. गाझा आणि इतर ठिकाणी इस्राइलने कब्जा केलेल्या ठिकाणी पॅलेस्टाईनचं राष्ट्र तयार करण्यासाठी हा गट तयार करण्यात आला होता. (Latest News)
हमास आणि इस्लामिक संघटनेची युती
हमास आणि इस्लामिक जिहाद गाझामध्ये संयुक्तपणे लष्करी कारवाया करतात. परंतु काहीवेळा ते हमासच्या धोरणांशी सहमत नसतात. काही वृत्तानुसार इस्लामिक संघटनेने इस्राइलवर हल्ला करू नये यासाठी हमासने त्यांच्यावर दबाव टाकला होता. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये फूट पडली होती. त्यानंतर इस्लामिक संघटनेने इस्राइलवर हल्ला केला. हमासपासून वेगळे होऊन या पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद संघटनेने आत्तापर्यंत इस्राइलवर अनेकवेळा प्राणघातक हल्ले केलेत. यात २०१८, २०१९, २०१९, २०२०, २०२१, या वर्षांमध्ये हल्ला केला होता.
इराणकडून मिळतो फंड
या संघटनेला इराण प्रशिक्षण देत असते. इराण या संघटनेतील दहशतवाद्यांना शस्त्र, आधुनिक हत्यारं पुरवत असतो. अमेरिकेनेही या संघटनेला दहशतवादी संघटना म्हटलंय. याशिवाय, अमेरिकन सरकारच्या वेबसाइटवरील अहवालानुसार, या संघटनेला सीरिया आणि लेबनीज हिजबुल्लाहकडूनही पूर्ण पाठिंबा मिळतो.
ही संघटना सीरिया, लेबनॉन, गाझापट्टी, आणि इस्राइलमध्ये सक्रीय आहे. इराणची राजधानी तेहरान येथे या पॅलेस्टाईन इस्लामिक जहादी संघटनेचं मुख्यालय आहे. सुमारे १ हजार सदस्य त्यात सक्रिय आहेत.इस्राइल बरोबरच अमेरिकेने देखील या संघटनेला १९९७ मध्ये दहशतवादी संघटना घोषित केले आहे. वर्ष २०१४ मध्ये अमेरिकेने पॅलेस्टाईन इस्लामिक संघटनेचे महासचिव झियाद अल-नखला यांला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.