इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भीषण युद्ध सुरु आहे. गेल्या 11 दिवसांत 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक जखमी झाले आहेत. इस्रायलने हमास या दहशतवादी संघटनेचा नाश करण्याची शपथ घेतली आहे. मंगळवारी इस्रायलने हमासच्या सेंट्रल ब्रिगेडचा कमांडर आणि मिलिटरी इंटेलिजन्सचा माजी प्रमुख अयमान नोफल याला ठार केलं आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) या हल्ल्याचा व्हिडिओही जारी केला आहे. आयडीएफने ट्विट करत म्हटलं आहे की. “आम्ही हमासच्या माजी प्रमुख आयमन नोफल याला ठार केलं. नोफल हा गाझामधील हमासच्या सेंट्रल ब्रिगेडचे कमांडर आणि लष्करी गुप्तचर विभागाचा माजी प्रमुख होता. नोफालने इस्त्रायली नागरिकांवर अनेक हल्ले केले होते. तो दहशतवादी संघटनेतील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होता.
आयडीएफच्या म्हणण्यानुसार, गिलाड शालितच्या अपहरणाच्या प्लॅनिंगमध्ये अयमान नोफलचा सहभाग होता. आयडीएफने पुढे घोषणा केली आणि लिहिलं की, जोपर्यंत आम्ही हमासला पूर्णपणे संपवत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. (Latest Marathi News)
गिलाड शालित हा इस्रायल संरक्षण दलाचा माजी MIA सैनिक आहे. त्याला 25 जून 2006 रोजी इस्रायल सीमेजवळ पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी पकडले होते. 18 ऑक्टोबर 2011 रोजी कैदी देवाणघेवाण करारांतर्गत त्याची सुटका होईपर्यंत, त्याला हमासने पाच वर्षांहून अधिक काळ बंदिवासात ठेवले होते. शेवटी इस्रायलने या अपहरणाचा बदला तर घेतलाच, शिवाय हजारो नागरिकांचे प्राण घेणार्या दहशतवाद्यालाही ठार केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.