Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची CBI चौकशी होणार का? दिग्गज नेत्यांची नावं घेत अंबादास दानवेंचं विरोधकांना सडेतोड उत्तर

Ambadas Danve : मातोश्री हेरणारे रडार अजून जन्माला आले नाही.

डॉ. माधव सावरगावे

Mumbai News :

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सीबीआय चौकशी होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध बिल्डरवर झालेल्या कारवाईनंतर अशी चर्चा सुरु आहे.

उद्धव ठाकरेंची सीबीआय चौकशीच्या विरोधकांमध्ये सुरु असलेल्या चर्चांवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्याआधी भाजप खासदार नारायण राणे, यशवंत जाधव, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, भावना गवळी असे अनेक नेते आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे. (Latest Marathi News)

मातोश्रीमध्ये काय आहे. मातोश्रीला हेरणारे रडार अजून जन्माला आले नाही. तिकडे काहीही घोळ नसतात, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.  

उद्धव ठाकरे कोणत्या भानगडीत पडत नाही. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कसं आहे, हे अख्खा देशाने पाहिलं आहे. त्यामुळे असे रडार मातोश्रीचं काय करु शकत नाहीत, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं. (Political News)

सीबीआयने कोट्यवधी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात मुंबईतील यूआयएल कंपनीचे किशोर आवरसेकर यांच्यासह इतर संचालकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यानंतर अशा चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अपहरण करून शेतात फरपटत नेलं, अत्याचारानंतर मुलीला तडफडवलं; ८ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये 'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील 'या' सदस्याची एन्ट्री, कोण आहे ती?

Gk : मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते? कारण वाचून तुम्ही ही पडाल विचारात

SCROLL FOR NEXT