Mumbai Police Homes : मुंबई पोलीस परिवाराला 'बाप्पा' पावला, घरांच्या लॉटरीची तारीख ठरली, करारही लगेच होणार

Mumabi Police News : वरळी, नायगांव, डीलाईरोडमधील बीडीडी चाळीतल्या पोलिसांना हक्काचं घर मिळणार आहे.
Eknath SHinde- Devendra Fadnavis
Eknath SHinde- Devendra FadnavisSaam Tv
Published On

Mumbai News :

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पोलीस परिवाराला 'बाप्पा' पावला आहे. येत्या २१ सप्टेंबरला पोलिसांच्या घरांची लॅाटरी निघणार आहे. वरळी, नायगांव, डीलाईरोडमधील बीडीडी चाळीतल्या पोलिसांना हक्काचं घर मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी १५ लाखात घरं देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या लॅाटरीनंतर लगेच घरांचे करार सुरु होणार आहेत.

Eknath SHinde- Devendra Fadnavis
Shivsena News: दिल्लीश्वरांनी महाराष्ट्राच्या माथी लादलेले हे संकट कायमचे दूर कर; 'सामना'तून 'बाप्पा'ला साकडे

गेली अनेक वर्ष हक्काच्या घरांसाठी पोलीस परिवाराचा संघर्ष सुरु होता. पोलिसांच्या करारानंतर शिंदे-फडणवीसाचं वरळीत जंगी स्वागत होणार आहे. (Latest Marathi News)

Eknath SHinde- Devendra Fadnavis
Ganpati Viral Video : हत्तीकडून लाडक्या बाप्पाला हार घालून मानवंदना, व्हिडीओ एकदा पाहाच

वरळी बीडीडी चाळ येथील चाळ २२ ते २८, ६४ ते ७४ व ७७ मधील पुनर्विकास प्रकल्पातील लाभार्थींसाठी ही लॉटरी असणार आहे. येत्या २१ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता गुलझारीलाल नंदा सभागृह तिसरा मजला गृहनिर्माण भवन (म्हाडा), कलानगर, वांद्रे येथे RAT पद्धतीने पात्र गाळेधारकांकरीता सदनिका क्रमांक निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com