Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश

KDMC Election MNS Prakash Bhoir News : केडीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का बसला असून कल्याण ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर व पत्नी सरोज भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Alisha Khedekar

  • मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि पत्नी सरोज भोईर यांचा भाजपमध्ये प्रवेश

  • केडीएमसी निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणाला वेग

  • भोईर यांच्या पक्षांतरामुळे मनसे अडचणीत

  • नागरिक व राजकीय जाणकारांमध्ये चर्चांना उधाण

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

केडीएमसी निवडणुका जवळ येत असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच आज मनसेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीने देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रकाश भोईर यांच्या भाजपच्या पक्षप्रवेशानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भोईर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोरात होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भूमीपूजन कार्यक्रमात ते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत उपस्थित असल्याचे समोर आले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी भोईर यांनी मनसेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

मात्र राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जातात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर त्यांनी व त्यांच्या पत्नी सरोज भोईर यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. प्रकाश भोईर व त्यांच्या पत्नी सरोज भोईर हे दोघेही माजी नगरसेवक होते.

त्याच बरोबर प्रभागात त्यांची छाप आहे. त्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने आगामी निवडणुकीत मनसेला आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अशातच त्यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपची ताकत वाढल्याचे दिसून येत आहे.असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live : इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 उमेदवार विजयी

अहिल्यानगरमध्ये भाजपचा दणदणीत विजय, राहाताच्या राजकारणात विखे पाटलांचे वर्चस्व कायम|VIDEO

Emraan Hashmi : इमरान हाश्मी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी; पोटातले टिश्यू फाटले, नेमकं घडलं काय?

Husband Name Mangalsutra Design: नवऱ्याच्या नावाचे घाला मंगळसूत्र!, या आहेत ट्रेडिंग 5 डिझाईन्स

Diabetes: डायबिटीज असलेल्या रुग्णांना किडनी खराब होण्याचा धोका, 'ही' १ चूक ठरते कारण

SCROLL FOR NEXT