Kalyan Vikas Desale Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : भाजपचा शिंदेसेनेला पुन्हा धक्का, कल्याणमधील शिलेदार फोडला

Kalyan Dombivli Vikas Desale : कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपात प्रवेश केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडणार आहेत.

Alisha Khedekar

  • विकास देसले यांनी शिंदे गटाला केला रामराम

  • शिवसेना सोडून भाजप गटात केला प्रवेश

  • आगामी निवडणुकांचे समीकरण बदलण्याची शक्यता

  • राजकारणात खळबळ

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी आज अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. या घडामोडीमुळे शिंदे सेनेला तडा गेल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत असून आता कल्याण ग्रामीणमधील उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी आज भाजपात प्रवेश केला. डोंबिवलीतील कार्यक्रमात निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, तसेच भाजप नेते दीपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत देसले यांनी भाजपची मफलर गळ्यात घालून प्रवेश केला. या प्रवेशानंतर ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्त्यांनीही देसले यांच्या सोबतच भाजपा प्रवेश करून पक्षाला मोठी ताकद दिली.

विकास देसले यांनी प्रवेशानंतर बोलताना सांगितले की, भाजपच्या विकासकामांवर विश्वास ठेवून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून हा निर्णय घेतला आहे. कल्याण ग्रामीणचा विकास हा माझा प्राथमिक उद्देश आहे. यानंतर भाजप नेत्यांनी देसले यांच्या प्रवेशाचे स्वागत केले.

याशिवाय आगामी निवडणुकांमध्ये भाजप अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे शिंदे सेनेत या गळतीमूळे अस्वस्थता पसरल्याचे समजते. कल्याण ग्रामीणमधील राजकारण अधिक चुरशीचे झाले असून, या प्रवेशामुळे भाजपला निश्चितच नवीन ऊर्जा मिळाल्याचे दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह पोलिसांचा पहारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

Tapovan Tree Cutting: 'आमच्या तपोवनाला हात लावू नये...'; नाशिक तपोवन वृक्षतोडीविरोधात मराठी कलाकारांचा संताप

Chia Seeds: थंडीत सब्जा खा; त्वचा, वजन आणि तब्येतीसाठी उपयोगी

Sanchar Saathi App: एका दिवसात ६ लाख लोकांनी डाउनलोड केला 'संचार सारथी'; अ‍ॅपची खासियत आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT