Kalyan Dombivli Manda Patil News Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : डोंबिवलीत राज ठाकरेंना मोठा धक्का! बड्या नेत्याने मनसेला केला रामराम

Kalyan Dombivli Manda Patil News : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील माजी मनसे नगरसेविका मंदा पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. मनसेसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

Alisha Khedekar

  • माजी मनसे नगरसेविका मंदा पाटील यांचा भाजपात प्रवेश

  • महापालिका निवडणुकांपूर्वी मनसेला मोठा राजकीय धक्का

  • पदनियुक्त्यांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर घेतला निर्णय

  • कल्याण-डोंबिवलीत भाजपची ताकद वाढली

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून येत्या १५ रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र कल्याण डोंबिवली परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लागलेली गळती काही थांबताना दिसत नाही. डोंबिवलीतील मनसेच्या माजी नगरसेविका मंदा पाटील यांनी अखेर मनसेला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश मनसेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच मंदा पाटील यांनी मनसेतील पदनियुक्त्यांबाबत नाराजी व्यक्त करत वरिष्ठ नेत्यांवर थेट टीका केली होती. पक्षात कार्यकर्त्यांना आणि माजी पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

त्या नाराजीनंतर आज त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने मनसेतील अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा उघड झाला आहे. कल्याण डोंबिवलीत यापूर्वीही अनेक पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधींनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाची अडचण वाढत चालली आहे.

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करताना मंदा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपसोबत काम करण्याचा निर्धार केला. भाजपच्या नेतृत्वानेही त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करत आगामी निवडणुकांसाठी पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. एकीकडे भाजपमध्ये बळकटी वाढत असताना, दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेतील गळती थांबवणे हे पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT