Kalyan Railway Station 
मुंबई/पुणे

कल्याण रेल्वे स्थानकात पोलिसांनी वाचवला महिलेचा प्राण

कल्याण रेल्वे स्थानकात एका महिलेचा गाडीमध्ये चढत असताना तोल गेल्याने त्या फलाटावर पडल्या, त्या गाडीखाली जात असताना पोलिसांनी त्यांना बाहेर ओढलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कल्याण : मुंबईमध्ये अनेक वेळा रेल्वे अपघाताच्या (Railway Accident) घटना घडत असतात. मात्र, त्याचवेळी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेक अपघातांमधून लोकांना जीवदान मिळाल्याच्या बातम्या देखील आपण वाचत, ऐकत असतो. असाच एक प्रकार मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला आहे.

मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान येणारी दुरंतो एक्सप्रेस मेल कल्याण रेल्वे स्थानकात (Kalyan Railway Station) फलाट क्रमांक पाचवर आली असता. सीएसटी (CSMT) स्टेशनपर्यंत जाणारी महिला कल्याण स्टेशनलाच सीएसटी स्टेशन समजून कल्याणमध्ये उतरल्या मात्र, त्या महिलेला त्यांच्या सोबत असणारे आपले पती खाली न उतरल्याचं समजताच त्यांनी पुन्हा गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, गाडीमध्ये चढत असताना त्यांचा तोल गेल्याने त्या फलाटावर पडल्या आणि त्या गाडी खाली जात असतानाच कल्याण रेल्वे स्टेशनवर असलेल्या महिला सहपोलीस फौजदार डोमाडे, महिला पोलिस नाईक गव्हाणे, महिला पोलीस नाईक काटकर यांनी तत्काळ विलंब न करता गाडी खाली जात असलेल्या महिलेस बाहेर ओढून काढले आणि त्यांचा जीव वाचवला. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

नंद राम मोर्या असं या महिलेचं नाव असून मेलमधून प्रवाशाने चेन खेचून गाडी थांबवण्यात आली आणि मोर्या यांच्या पतीची भेट घालून त्यांना सीएसटीकडे रवाना करण्यात आलं. यावेळी वयस्कर मोर्या पती-पत्नीने पोलिसांचे आभार मानले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Crime : धक्कादायक! काँग्रेस नेत्याने पत्नीला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, महाराष्ट्र हादरला

Mumbai Rent Rules: मुंबईकरांच्या कामाची बातमी! घर भाड्याने देण्यापूर्वी हे काम कराच अन्यथा ₹५००० दंड भरा

Vipreet Rajyog 2025: 28 नोव्हेंबर रोजी मीन राशीत मार्गी होणार शनी; विपरीत राजयोगामुळे मिळणार पैसाच पैसा

Local Body Election : राज्यात मोठी राजकीय उलथापालथ? २८८ पालिका-पंचायतींसाठी स्थानिक नेतेच ठरवणार उमेदवार

SCROLL FOR NEXT