शिवसेनेला धक्का; आमदार रमेश लटकेंचं दुबईत निधन

आमदार रमेश लटके हे त्यांच्या कुटुंबियांसह दुबईला गेले होते.
Ramesh Latke
Ramesh LatkeSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व विधान सभा मतदार संघातील शिवसेनेते आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आमदार रमेश लटके हे त्यांच्या कुटुंबियांसह दुबईला गेले होते तीथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. आमदार लटके यांच्या निधनाची माहीती मिळताच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कळवली आहे. लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

हे देखील पाहा -

आमदार रमेश लटके यांचे पार्थिव मुंबईत आणन्याची तयारी सुरू असून लवकरच त्यांचे पार्थिव दुबईतून मुंबईत आणलं जाणार आहे. लटके हे अंधेरी पुर्व विधान सभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. ते सलग २ टर्म शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष असलेले रमेश लटके हे १९९७ साली प्रथम मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com