Mumbai News  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : लोकसभा निवडणुकीदरम्यान आमदार नितेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा, काय आहे नेमकं प्रकरण?

Fir Fie against nitesh rane and geeta jain : लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली.

Vishal Gangurde

मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली. दोन्ही आमदारांनी जानेवारी महिन्यात ठाणे जिल्ह्यात भडकाऊ भाषण केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

न्यायाधीश रेवती माहिते डेरे आणि न्यायाधीश मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाला पोलिसांनी ही माहिती दिली. सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी कोर्टात सांगितले की, मीरा-भाईंदरमध्ये हिंसाचारादरम्यान भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार गीता जैन यांनी प्रक्षोभक भाषण केले.तसेच राणे यांच्यावर मुंबईतील मालाड येथील मालवणी, मानखुर्द आणि घाटकोपर या भागात रॅलीमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. तर गीता जैन यांच्यावर मीरा-भाईंदरच्या एका रॅलीमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही नेत्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३, ५०४, ५०६ या अंतर्गत एफआयआर नोंद केला आहे. मीरा-भाईंदरमधील हिसांचारादरम्यान देखील काही व्यक्तींवर एफआयआरची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

१९ जूनला होणार पुढील सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जूनला होणार आहे. नितेश राणे, गीता जैन आणि तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांच्याकडून जानेवारीत ठाणे जिल्ह्यातील मीरा रोडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कारवाईसाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच याचिकेमध्ये प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांविरोधात एफआयर नोंद करण्याची मागणी करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Maharashtra News Live Update: : बीडच्या माजलगाव येथील लाहमेवाडी येथे टायर जाळत रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचा निषेध

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT