Latur News: गावात नो एन्ट्री! मराठा बांधवांनी अडवला भाजप आमदारांचा ताफा; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घेरलं

Loksabha Election 2024: लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी निलंगेकर हे आले असता मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. लातूरच्या बोरोळ गावात यात्रेसाठी जात असताना गावातील मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा आडवला आहे .
Loksabha Election 2024:
Loksabha Election 2024:Saamtv

संदिप भोसले, लातूर|ता.२४ एप्रिल २०२४

भाजप आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवल्याची बातमी समोर आली आहे. काल सायंकाळी देवणी तालुक्यातील बोरोळ गावात हा प्रकार घडला. लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी निलंगेकर हे आले असता मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राज्यभरात प्रचाराचा धडाका पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. असाच प्रकार लातूरमधून समोर आला असून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा ताफा मराठी बांधवांकडून अडवण्यात आला.

आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचाराअर्थ सध्या जिल्हाभरात फिरत आहेत. मात्र काल सायंकाळी 6 वाजता आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना लातूरच्या बोरोळ गावात यात्रेसाठी जात असताना गावातील मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा आडवला आहे .

Loksabha Election 2024:
Akola News: दुहेरी हत्याकांडाने अकोला हादरलं, पत्नीसह ९ वर्षाच्या मुलीला पतीने गाढ झोपेतच संपवलं

यावेळी एक 'मराठा लाख मराठा'च्या घोषणा देखील तरुणांनी दिल्या आहेत. तर भाजप कार्यकर्ते आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची देखील झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान आंदोलकांचा रोष पाहून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना अर्ध्या रस्त्यातूनच परतावे लागले आहे..

Loksabha Election 2024:
Police Action: उत्तर महाराष्ट्रातून २२० गुंड तडीपार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com