Pune Police: डिलेव्हरी बॉय, तर कधी दूधवाला; वेषांतर करुन २ गुंडाना केले जेरबंद Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police: डिलेव्हरी बॉय, तर कधी दूधवाला; वेषांतर करुन २ गुंडाना केले जेरबंद

शुभम दीपक पवळे आणि आकाश सासवडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव

गोपाळ मोटघरे

पुणे: कधी फूड डिलिव्हरी (Delivery) बॉय, तर कधी दुध वाला, तर कधी मॅकेनिक बनून पुणे (Pune) पोलिसांनी (Police) मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी (Accused) शुभम दीपक पवळे आणि आकाश सासवडे अशी अटक (Arrested) करण्यात आलेल्या २ आरोपीचे नाव आहेत. शुभम पवळे आणि आकाश सासवडे ह्या दोन्ही मोठ वॉन्टेड आरोपीवर पुण्यातील (Pune) समर्थ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या अनेक कलमाखाली गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Police Delivery Boy Pune Police Arrested Accused)

हे देखील पहा-

मात्र गेल्या, ११ महिन्यापासून पोलीस (Police) या दोन्ही आरोपीच्या शोधावर होते. वारंवार पुणे (Pune) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले आरोपी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात तर कधी वेगवेगळ्या राज्यात वास्तव्यास होते. त्यामुळे या आरोपींना शोधण्याचे मोठ आव्हान पोलिसांसमोर होते. बरेच दिवस पोलिसांना चकवा दिल्यानंतर शुभम पवळे आणि आकाश सासवडे या दोन्ही आरोपींना वाटले की आता प्रकरण शांत झाले आहे. म्हणून ते पुण्यातील लोहगाव (Lohgaon) जवळील वडगाव शिंदे भागातील जाधव वस्तीत घर भाड्याने घेऊन राहण्यास आले होते.

शुभम पवळे आणि आकाश सासवडे यांच्या पुण्यातील वास्तव्यासाठी खात्रीशीर गुप्त माहिती समर्थ पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर समर्थ पोलिस स्टेशन मधिल सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप जोरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कधी फुड डिलिव्हरी बॉय, तर कधी दूधवाला, तर कधी मेकॅनिक बनवून शुभम पवळे आणि आकाश सासवडे यांची माहिती काढण्यात आली.

या दोन्ही आरोपींची खात्रीशीर माहिती मिळताच, संदीप जोरे यांनी आपल्या टीमसह दोन्ही कुख्यात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. शुभम पावडे आणि आकाश सासवडे हे नाना पेठेतील एस टी गँगचे सदस्य असून, त्यांची नाना पेठ परिसरामध्ये मोठी दहशत होती. मात्र, ती दहशत आता समर्थ पोलिसांनी मोडून काढली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT