Supriya Sule: "फक्त महाविकास आघाडीच्याच नेत्यांना ईडी नोटीस का"?- सुप्रिया सुळे

आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु
Supriya Sule News
Supriya Sule NewsSaam Tv
Published On

पुणे: नवाब मलिकांनी (Nawab Malik) अनेक भाजपच्या नेत्यांची नावे घेतली आहेत. यामुळेही त्यांना ईडीची (ED) नोटीस आली ही शक्यता नाकारता येणार नाही. नवाब मालिक सातत्याने खरे बोलत होते. यामुळेही झाले असणार आहे. कारण सतत आम्हाला धमकी (Threat) दिली जात आहे. त्यामुळे मला त्याच आश्चर्य वाटत नाहीत. खरं तर भाजपचं (BJP) ईडी चालवत असणार आहे. भाजपचे आणि ईडीचे (ED) अध्यक्ष एक असतील. किंवा भाजपने स्वतः चा माणूस ईडी चालवायला ठेवला असणार आहे. असे असू शकते. माझा ईडीचा काही अभ्यास नाही. जाणीवपूर्वक ठरवून या गोष्टी केले जात असल्याचे मत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

हे देखील पहा-

ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून खूप चांगला उपयोग भाजपचे लोक या धमक्याकरिता करत आहेत. हे निदर्शनास दिसून आले आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावेळी केली आहे. मला कोणत्याही प्रकारची चिंता वाटत नाही नवाब मलिक महाराष्ट्रात (Maharashtra) कॅबिनेट मंत्री आहेत. दुसरे त्यांच्यावर कारवाई करण्याअगोदर त्यांना कोणत्या प्रकारची नोटीस (Notice) आली होती का? तर माझ्या माहितीप्रमाणे नाही. माझा स्वतःचा नवाबांशी बोलणे झाले नाही. पण मला जी माहिती मिळत आहे.

Supriya Sule News
Delhi: अमेरिकन महिलेच्या डोळ्यातून काढल्या ३ जिवंत माश्या; भारतात शस्त्रक्रिया यशस्वी

त्यानुसार त्यांच्या घरी जाऊन हे पथक धडकले आहे. नवाब यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार या पथकाला पूर्ण माहिती देत सहकार्य करण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. यामुळे मला कोणत्याही प्रकारची चिंता देखील वाटत नाही. अन आश्चर्यही वाटत नाही, की नवाब भाईकडे ईडीची नोटीस आली आहे. कारण ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक काही ट्विट करत असतात. असे म्हणण्यापेक्षा ट्विट करत याला अटक करणार आहेत. त्याला अटक करणार आहेत, अशी धमकी देत असतात. गेले अनेक दिवस, अनेक महिने महाविकास आघाडी मधील मंत्र्यांना ईडीची नोटीस आलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर देशात ज्या- ज्या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये बोले जात आहे, त्या- त्या ठिकाणी चौकशी, ईडीच्या नोटीस आले आहेत. याविषयी मी स्वतः संसदेत बोलले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com