Delhi: अमेरिकन महिलेच्या डोळ्यातून काढल्या ३ जिवंत माश्या; भारतात शस्त्रक्रिया यशस्वी

दिल्लीमध्ये एका रुग्णालयात एका महिलेच्या डोळ्यातून चक्क ३ जिवंत बोटफ्लाय माशा ऑपरेशन करुन काढण्यात आले
Delhi: अमेरिकन महिलेच्या डोळ्यातून काढल्या ३ जिवंत माश्या; भारतात शस्त्रक्रिया यशस्वी
Delhi: अमेरिकन महिलेच्या डोळ्यातून काढल्या ३ जिवंत माश्या; भारतात शस्त्रक्रिया यशस्वी Saam Tv
Published On

वृत्तसंस्था: दिल्लीमध्ये (Delhi) एका रुग्णालयात (hospital) एका महिलेच्या डोळ्यातून चक्क ३ जिवंत बोटफ्लाय माशा ऑपरेशन (Operation) करुन काढण्यात आले आहे. ही महिला अमेरिकेची (America) नागरिक असून काही दिवसाअगोदर ती अॅमेझॉनच्या (Amazon) जंगलाच्या दौऱ्यावर गेली होती. तिथे मायियासिस हा एक दुर्मिळ, अगदी केसासारखा इन्फेक्शन (Infection) प्रकार डोळ्यांच्या टिश्यूमध्ये आढळून आला होता. दिल्लीत (Delhi) फोर्टीस रुग्णालयामध्ये (hospital) या ३७ वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. (3 live flies extracted from eye an American woman)

हे देखील पहा-

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या ४-५ आठवड्यात महिलेच्या डोळ्यामध्ये काही तरी खुपत होते. तिने अमेरिकेतील (America) डॉक्टरांकडे ट्रिटमेंट केली होती. मात्र, काही फरक पडला नाही. अखेर भारतात (India) येऊन महिलेवर योग्य उपचार करण्यात आले आहेत. शस्त्रक्रियेवेळी महिलेच्या डोळ्यातून २ सेमी आकाराच्या ३ माशा काढण्यात आले आहेत. महिलेला एनेस्थेशिया देऊन सर्व काळजी घेऊन १०- १५ मिनिटांत शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. महिलेला काही काळ ICU मध्ये डॉक्टरांच्या निगरणीखाली ठेवण्यात आले होते. नंतर तिला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

Delhi: अमेरिकन महिलेच्या डोळ्यातून काढल्या ३ जिवंत माश्या; भारतात शस्त्रक्रिया यशस्वी
Nawab Malik: 'या' माहितीच्या आधारावर नवाब मलिकांची ईडीकडून कसून चौकशी सुरू

मायियसिस मानव ऊतक असलेली लार्वा माशीचे संक्रमण झाले होते. हा माशा उष्णकटिबंधीय आणि उप उष्णकटिबंधीय क्षेत्रात आढळत असतात. रुग्णालयाचे आपतकालीन विभागाचे प्रमुख डॉ. मोहम्मद नदीमने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मायियासिस हा फार दुर्मिळ प्रकार होता. या प्रकारात तात्काळ मूल्यांकन करण्याची गरज आहे. अमेरिकन महिलेने २ महिन्यांपूर्वी अँमेझॉन जंगलाचा दौरा केला होता. या प्रवासाच्या दरम्यान महिलेला संसर्ग झाल्याचा संशय आहे. प्रवासावरुन आल्यावर महिलेला तिच्या डोळ्यांच्या त्वचेमध्ये काही हालचाली जाणवायला सुरुवात झाली होती.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com