बैलांच्या बेकायदा शर्यतीवर पोलिसांची धडक कारवाई सागर आव्हाड
मुंबई/पुणे

बैलांच्या बेकायदा शर्यतीवर पोलिसांची धडक कारवाई

बैलगाडा शर्यत आयोजित करण्यास बंदी असतानाही, कायद्याचे उल्लंघन करीत बैलगाडा शर्यत भरवून, पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी १० ते १२ जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे : बैलगाडा शर्यत आयोजित करण्यास बंदी असतानाही, कायद्याचे उल्लंघन करीत बैलगाडा शर्यत भरवून, पोलिसांशी Police हुज्जत घातल्याप्रकरणी १० ते १२ जणांविरुद्ध भारती विद्यापीठ Bharati Vidyapith पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Police crack down on illegal racesdvj97

ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता कात्रज Katraj जवळच्या गुजरवाडी Gujarwadi याठिकाणी घडला आहे. संतोष अशोक ननवरे (वय- ४६) रा. गोकुळनगर, कोंढवा, योगेश बाळासाहेब रेणुसे (वय- २९), रा. नेरावणे, वेल्हे, मयूर दिलीप शेवाळे (वय- २६), रा. देवाची उरुळी, शेवाळेवाडी, हरिश्चंद्र भागा फडके (वय- ५२), पद्माकर रामदास फडके (वय- ३७), पंढरी जगन फडके (वय- ५५) तिघेही रा. विहीगर, नेरे, पनवेल, ऋषिकेश चंद्रकांत कांचन (वय- २३), रा. उरुळी कांचन, संकेत शशिकांत चोरगे(वय- २१), यश राजु भिंगारे (वय- १९), संतोष शिवराम कुडले (वय- ४१), तिघेही रा. भेलकेवाडी, भोर आणि राहुल प्रकाश चौधरी (वय- ३४), रा. वारजे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.

हे देखील पहा-

याच्यांविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या, कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिस हवालदार रविंद्र चिप्पा यांनी भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, राज्यात State कायद्यानुसार बैलगाडा शर्यत आयोजित करण्यास बंदी आहे, असे असतानाही कायद्याचे उल्लंघन करत कात्रज जवळच्या गुजरवाडी या ठिकाणी डोंगराच्या बाजूला असलेल्या, सपाट मैदानामध्ये शनिवारी सकाळी ९:३० ते १०:३० वाजेच्या सुमारास पंढरी फडकेसह एका व्यक्तीने बैलगाडा शर्यत भरविली होती. Police crack down on illegal racesdvj97

याठिकाणी बैलांना गाड्यांना जोडून, निर्दयपणे मारहाण करत, त्यांची शेपटी पिरगलून, जबरदस्तीने पळवत त्यांना निर्दयपणे वागविले जाते. या प्रकाराबाबत फिर्यादीने आयोजकांसह इतरांना सांगितले आहे. मात्र, त्यांनी फिर्यादीशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला आहे. यानंतर शर्यतीत एक बैल व एक छकडा पळवून लावला आहे. कोरोना संबंधी नियमांचे उल्लंघन केले आहेत. याप्रकरणी १० ते १२ जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT