Video Saam TV
मुंबई/पुणे

Whatsapp ग्रुपमध्ये आला कॉन्स्टेबल पत्नीचा अश्लील व्हिडीओ, सोबत होता दुसरा कॉन्स्टेबल; मुंबईतील घटनेने खळबळ

पीडित पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित कॉन्स्टेबलवर मानहानीचा गुन्हाही दाखल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुंबईत एका पोलीस कॉन्स्टेबलने दुसऱ्या पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अश्लील व्हिडिओ शेअर करणारी व्यक्ती त्यात स्वतः दिसत आहे तर ती महिला दुसऱ्या पोलिसाची पत्नी होती. पोलीस कॉन्स्टेबलवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मुंबई पोलिसात कार्यरत आहे. ते एका व्हॉट्सअॅप ग्रुपशी संबंधित होता, 9 डिसेंबर रोजी परबने स्वतःचा आणि एका महिलेचा अश्लील व्हिडिओ शेअर केला होता. अश्‍लील व्हिडीओमध्ये कॉन्स्टेबल परबसोबत दिसणारी महिला दुसऱ्या पोलीस कॉन्स्टेबलची पत्नी असल्याने सर्वांनाच धक्का बसला. (Mumbai Crime)

त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीची विचारपूस केली. व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडिओ शेअर करून आरोपीच्या विरोधात बदनामी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास सांगितले. परंतु त्याच्या पत्नीने तसे करण्यास नकार दिला. यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीच्या कुटुंबीयांना बोलावून सातारा येथील तिच्या माहेरी पाठवले.

पत्नीला माहेरी पाठवल्यानंतर कॉन्स्टेबलने वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरुन आरोपी आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या अज्ञात मोबाईल नंबर धारकाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 500 , 292, 293, 34 आणि 67 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित कॉन्स्टेबलवर मानहानीचा गुन्हाही दाखल केला आहे. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कॉन्स्टेबलला नोटीस बजावली असून त्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत त्याला निलंबित करण्यात आले आहे. तक्रारदाराने नोंदवलेल्या गुन्ह्यात आरोपींवर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT