Police Constable Heart Attack Saam TV
मुंबई/पुणे

Police Constable Heart Attack: गस्तीवर असताना हृदयविकाराचा झटका; पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू

Culaba Fort News: हृदयविकाराच्या झटक्याने एका पोलीस हवलदाराचा ऑन ड्यूटीवर असताना मृत्यू झाला आहे.

Ruchika Jadhav

सचिन गाड

Mumbai Police:

मृत्यू कधी आणि कसा ओढावेल काही सांगता येत नाही. हसता खेळता व्यक्तींना हृदयविकाराचे झटके येतात आणि क्षणात होत्याचं नव्हतं होतं. कुलाब्यातून अशीच एक दु:खद घटना समोर आली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने एका पोलीस हवलदाराचा ऑन ड्यूटीवर असताना मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

गस्तीवर असताना हार्टअटॅक

सोमनाथ गोडसे असं मृत पोलीसांचे नाव आहे. ते डोंगरी पोलीस ठाण्यात रूजू होते. शनिवारी रात्री पी डिमेलो रोडवर पोलीस मोबाईल १ वर त्यांची रात्रपाळी होती. कर्तव्यावर असताना अचानक ते चक्कर येऊन खाली कोसळले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं.

पोलीस हवालदार गोडसेंना जे जे रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दाखल पूर्व मयत घोषित केले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टर म्हणाले. पाच वर्षापूर्वी त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली होती. डोंगरी पोलिसांनी अपम्रूत्यूची (ADR) नोंद केली आहे.

ताणतणाव, रोजची व्यस्त जिवनशैली, खाण्यापीण्यातील पदार्थ यामुळे नागरिकांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम होत आहेत. कॉलेस्ट्रॉल, थायरॉड आणि शुगर अशा आजारांनी व्यक्तींना ग्रासले आहे. फक्त वयोवृद्ध नाही तर तरुण मुला-मुलींमध्येही हृदयविकाराचे झटके येण्याचं प्रमाण वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT