Thane Crime  Saam tv
मुंबई/पुणे

Thane Crime : ऑन ड्युटी पोलिस कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं, मुरबाड पोलिसांत खळबळ

Murbad Police News Update : पोलीस कर्मचाऱ्यांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कामावर असताना पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली.

अजय दुधाणे

Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधून (Murbad Thane) धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसाने ऑन ड्युटी असताना इमारतीवरून उडी घेऊन आयुष्य संपवल्याचं समोर आलेय. याप्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मुरबाड पोलिसांची (Police News) चर्चा ठाण्यात होत आहे. पोलिसाने इमारातीवरून उडी घेऊन आयुष्य का संपवलं? याचा तपास सध्या सुरू आहे. अद्याप ठोस असं कोणतेही कारण समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील मुरबाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार नामदेव चारस्कर यांनी इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवले. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. कामावर असतानाच असा टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. मुरबाड पोलिसांत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.

नामदेव चारस्कर यांनी कामावर असताना टोकाचे पाऊल उचललं, पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या पोलीस वसाहतीच्या इमारतीत ते राहत होते. या इमारतीच्या गच्चीवरून त्यांनी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास उडी मारून आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्या मागचं नेमकं कारण समजू शकले नाही, मात्र या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. नामदेव चारस्कर यांनी आयुष्य संपवलं की त्यांची कुणी हत्या केली? याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंडिया आघाडीच्या बैठकीत २५ पक्षांचे नेते; 'या' ५ मुद्द्यांवर झाले एकमत, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची एकमुखाने मागणी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये वादळी वारा पावसाने डाळिंब बागेला फटका

IND vs AFG: १ डाव आणि ३०० रन्स! अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; कसोटीतील सर्वात मोठा विजय नावावर

शक्तिपीठ महामार्गावरून राजकारण तापलं; समर्थक-विरोधक आमने-सामने; कोल्हापूरात मोठा गोंधळ

मार्कशीटच नाही, लिव्हिंगही नाही! मराठी शाळेतील नववी, दहावीचे वर्ग बंद; ६० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

SCROLL FOR NEXT