Mumbai Cyber Crime Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Cyber Crime: सायबर सिटीत सायबर गुन्ह्यांची स्थिती काय? खुद्द पोलीस आयुक्तांनीच दिली माहिती

Mumbai Cyber Crime News: सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत २०२३ मध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, मालमत्ता विषयक, फेटल अपघात, महिला अत्याचार यासारख्या गुह्यात घट झाली असली तरी सायबर गुह्यांचा आलेख चढताच राहिला आहे.

Sandeep Gawade

Mumbai Cyber Crime

सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत २०२३ मध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, मालमत्ता विषयक, फेटल अपघात, महिला अत्याचार यासारख्या गुह्यात घट झाली असली तरी सायबर गुह्यांचा आलेख चढताच राहिला आहे. मात्र, गत वर्षात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी एकही घटना घडली नाही, तसेच कुठल्याही प्रकारची जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना घडली नसल्याचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या वार्षिक पत्रकार परिषदेप्रसंगी नवी मुंबईचे अपर पोलिस आयुक्त दिपक साकोरे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे, परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, परिमंडळ-२चे उपायुक्त पंकज डहाणे, मुख्यालय उपायुक्त संजयकुमार पाटील, वाहतुक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२३ मध्ये महिला विषयक दाखल झालेल्या एकूण ७०३ गुह्यापैकी ६८९ (९८टक्के) गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. २०२२ च्या तुलनेत महिला विषयक गुन्हे ५९ ने कमी झाल्याचे दिसून येत आहे. २०२३ मध्ये बलात्काराचे एकूण २९९ गुन्हे दाखल झाले असून यातील सर्व गुन्हे उघडकिस आले आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२३ मधील बलात्काराच्या गुह्यात ४२ ने घट झाली आहे. तसेच २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दाखल पोक्सोच्या एकुण १२३ गुह्यातील सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

सायबर गुह्यात वाढ

सन २०२२ या वर्षामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०७ सायबर गुन्हे (आयटी ऍक्ट) दाखल झाले होते, त्यापैकी फक्त ७२ गुन्हे उघडकीस आले होते. मात्र २०२३ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सायबर पोलीस ठाणे सुरु झाल्यानंतर सायबर ग्न्हे नोंद करण्याच्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे या वर्षात ४०३ सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून यात तब्बल ४७ कोटी ८५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र सायबर पोलिसांना यातील ७६ गुन्हे उघडकीस आणण्यात तसेच त्यातील ३३ कोटी ८३ लाखांची रक्कम गोठविण्यात यश आले आहे. त्याशिवाय एनसीसीआरपी पोर्टलवर दाखल झालेल्या ७०९१ तक्रारीमध्ये देखील ६७ कोटी ७१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून त्यातील ६ कोटी ७८ लाखांची रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT