Raigad Breaking News: मुंबई गोवा महामार्गावर डिझेल तस्करी, 2 कोटीच्या डिझेलसह 6 टँकर जप्त

Raigad Breaking News: मुंबई गोवा महामार्गावर पेण जवळ तरण खोप इथं सुरू असलेल्या डिझल तस्करीचा रायगड पोलिसांनी भांडाफोड केला आहे. तब्बल २ कोटी रुपयांचे चोरीचे डिझेल आणि सहा टँकर हस्तगत केले आहेत
Raigad Breaking News
Raigad Breaking NewsSaam Digital
Published On

Raigad Breaking News

मुंबई गोवा महामार्गावर पेण जवळ तरण खोप इथं सुरू असलेल्या डिझल तस्करीचा रायगड पोलिसांनी भांडाफोड केला आहे. तब्बल २ कोटी रुपयांचे चोरीचे डिझेल आणि सहा टँकर हस्तगत केले आहेत. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जहीर लब्बे, महमद अली वहाब, महमद रियाज अन्सारी अशी त्यांची नावे असून त्यांचे सहा साथीदार अद्याप फरार आहेत. या प्रकरणी पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यात मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

चेहऱ्यावर गुंगीची पावडर फुंकून महिलेला लुटलं

शहरातील धामणकर नाका येथे बँकेतून पैसे काढून रिक्षासाठी उभ्या असलेल्या महिलेच्या चेहऱ्यावर गुंगीची पावडर फुंकून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्याने महिलेचे २९ हजार रुपये लाबंवले आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कोलते प्रकरणाचा तपास करत आहेत.

Raigad Breaking News
Dhule News : बँकेतून बाहेर निघताच चोरट्यांनी साधली संधी; वृद्धेचे ३ लाख रुपये लंपास

मंदिरात चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक

वर्धा जिल्ह्याच्या तळेगाव येथील श्रीकृष्ण मंदिरात चोरी करून ४० हजार रुपयांची रक्कम चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्यास सायबर सेल व सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक तपास करून जेरबंद केले. रोशन उर्फ बबन रमेश वरघट (रा. मरामाय नगर, काटोल, जि. नागपूर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून महागड्या कारसह १,९६५ रुपये रोख आणि मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे.

दत्तराज संतराज डोमेग्रामकर यांनी २१ डिसेंबर २०२३ मध्ये खरांगणा पोलीस ठाणे गाठून श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने ४० हजारांची रक्कम चोरून नेल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी खरांगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याचा समांतर तपास सायबर पोलिस ठाणे आणि सायबर सेलकडून सुरू असतानाच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी रोशन उर्फ बबन रमेश वरघट याचा शोध घेत ताब्यात घेण्यात आले.

त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने त्याच्या चार मित्रांबरोबर मिळून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून १,९६५ रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाइल, एम. एच. ०४, जीडी. ४३१६ क्रमांकाची कार जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांच्या निर्देशात वैभव कट्टोजवार, दिनेश बोथकर, नीलेश तेलरांधे, नीलेश कट्टोजवार, कुलदीप टांकसाळी यांनी ही कारवाई केली.

Raigad Breaking News
Dhule News : अडीच कोटींचा गुटखा जप्त; शिरपूर पोलिसांची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com