Ganpat Gaikwad Firing Case Update: गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण; 'त्या' जमिनीची किंमत किती? समोर आली महत्वाची माहिती

Ulhasnagar Firing Case Update: आपल्या मुलाला मारहाण केली म्हणून हा गोळीबार केल्याचं आमदार गायकवाड यांनी म्हटलंय. उल्हासनगरच्या एका जमिनीवरून हा वाद झालाय. या वादाचं रुपांतर गोळीबारात झालंय. या वादातील जमिनीविषयी माहिती हाती आली आहे.
Ganpat Gaikwad Firing Case Update:
Ganpat Gaikwad Firing Case Update:Saam tv
Published On

तुषार ओव्हाळ, मुंबई

Ulhasnagar Firing Case Update:

उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. आपल्या मुलाला मारहाण केली म्हणून हा गोळीबार केल्याचं आमदार गायकवाड यांनी म्हटलंय. उल्हासनगरच्या एका जमिनीवरून हा वाद झालाय. या वादाचं रुपांतर गोळीबारात झालंय. या वादातील जमिनीविषयी माहिती हाती आली आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार , उल्हासनगरच्या द्वारली गावात एक लाख 87 हजार स्केअर फुटाची जमीन आहे. या सव्वा एकर जमिनीचे मूळ मालक एकनाथ नामदेव जाधव आहेत. सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 25 कोटी रुपयांच्या घरात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1980 साली वतनात ही जमीन मिळाली होती, असा दावा त्यांचे कुटुंबीय करतात. ही जागा जर कुणाला विकायची असेल आणि नावावर करायची असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते.

1996 साली एकनाथ जाधव यांनी रांका डेव्हलपर्सला ही जागा काही हजारो रुपयांत कॉन्ट्रॅक्टवर दिली होती. पण रांका डेव्हलपर्सने यांनी कामच सुरू केलं नाही, म्हणून आमच्या वडिलांनी आणि आजोबांनी हे कॉन्ट्रॅक्ट मोडलं असं जाधव यांचे वारस म्हणतात. पण जाधवांनी ही जागा आपल्याला विकल्याचा दावा रांका डेव्हलपर्सने केला आहे. पण गेली अनेक वर्ष या जागेचा ताबा आपल्याला मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

जाधव कुटुंबीयांची कोर्टात धाव

तीन वर्षांपूर्वी रांका डेव्हलपर्सचे प्रमोद रांका यांनी भाजपचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. आमदार गायकवाड यांनी आम्हाला धमकी दिली असा आरोप जाधव यांची नात अंकिता जाधव यांनी केला. त्यामुळेच आम्ही शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांची मदत मागितल्याच जाधव यांनी सांगितलं. पण आमदार गायकवाड यांनी दबाव टाकल्यांना महसूल विभागाने ही जमीन रांका डेव्हलपर्सच्या नावावर केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. याविरोधात जाधव कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतली.

अन् प्रकरण पोलीस स्टेशनला पोहोचलं...

यावर 3 फेब्रुवारीला सुनावणीही होणार होती. पण आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांनी जमिनीवर काम सुरु केलं असा आरोप जाधव कुटुंबीयांनी केला. तेव्हा महेश गायकवाड तिथे पोहोचले आणि त्यांनी काम बंद करायला सांगितलं. त्यातूनच हा वाद वाढला आणि हे प्रकरण पोलीस स्टेशनला पोहोचलं. पोलीस स्टेशनमध्ये आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या.

सध्या महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहे. तर गणपत गायकड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं आहे. ज्या प्रकरणामुळे दोन राजकीय नेत्यांमध्ये वाद झाला ते प्रकरण राजकीय नव्हतंच. ती जमीनही दुसऱ्याची आणि वादही दुसऱ्याचा होता. उल्हासनगरच्या या वादात आणखी कुठले पैलू बाहेर येतील हे आता येत्या काळात कळेलच.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com