बोरिवली रेल्वे स्थानकातून दोन महिन्यांच्या मुलाची चोरी केल्याप्रमाणे बोरिवली जीआरपी तिघा आरोपींना अटक केली आहे. अवघ्या चार दिवसात पोलिसांनी या बाळाची सुखरूप सुटका केली आहे. 17 डिसेंबरच्या मध्यरात्री बोरिवली रेल्वे स्थानकातून एका जोडप्याच दोन महिन्यांचे बाळ चोरी झाली होती.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काल तपासला सुरुवात केली. तुटपुंज्या माहितीवर संशयित इसम बाळाला घेऊन सुरुवातीला जोगेश्वरी आणि नंतर गवंडी परिसरात गेल्याचे निदर्शनास आले. मात्र त्यानंतर त्याचा कोणताही सुगावा पोलिसांना लागत नव्हता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
खूप सखोल चौकशी केल्यानंतर आरोप पुण्याला असल्याच समजलं आणि त्याला पुणे रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली. राजा उर्फ कासम शेख याला अटक केल्यानंतर त्याने या गुन्ह्यातील इतर आरोपींचा उलगडा केला. त्यांने माहिती दिली की, बदलापूरला राहणाऱ्या आजगावकर नावाच्या जोडप्याला अकरा वर्षांपासून बाळ होत नव्हतं. त्याला हे समजलं असता त्याने दीड लाखात त्यांना बाळ देण्याचा आश्वासन दिलं. (Latest Marathi News)
आजगावकर कुटुंबा तयार होताच कासम शेखने रेकी करण्यास सुरुवात केली. बोरीवली रेल्वे स्थानकातील एका महिलेच बाळ आपण चोरी शकतो, अशी खात्री होताच त्याने दोन दिवस पाळत ठेवली आणि 17 डिसेंबरच्या मध्यरात्री महिला झोपलेली असताना बाळासह पसार झाला.
मोठ्या अथक प्रयत्नांनी पोलिसांनी बाळाची सुटका केली आणि तीन आरोपींना अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी कासम शेख सह या प्रकरणातला मध्यस्थी सय्यद मेहंदी आणि आजगावकर यांना अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.