Shinde Vs Thackeray: आमदार गोगावलेंच्या त्या वक्तव्यावरून वाद; महाडमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा

Shivsena Shinde Group Vs Thackeray Group: रायगडामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाडमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात पुन्हा एकदा राडा झाला आहे.
Shivsena Shinde Group Vs Thackeray Group
Shivsena Shinde Group Vs Thackeray GroupSaam Tv
Published On

Shivsena Shinde Group Vs Thackeray Group:

रायगडामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाडमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात पुन्हा एकदा राडा झाला आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडल्याने परिसरात तणावाचं वातारण निर्माण झालं आहे. आमदार भरत गोगावले यांच्या वक्तव्यावरून या दोन्ही गटात जुंपली आहे, असं बोललं जात आहे. यातच पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचं सांगण्यात येत आहे.

का झाला राडा?

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर अधिवेशनाच्या काळात भरत गोगावले यांनी एका टीव्ही चॅनलला मुलाखतीत देताना एक वक्तव्य केलं होतं. ज्यावरून हा राडा झाला आहे. ते म्हणाले होते की, ''बाळासाहेब ठाकरे आता वर गेलेत, त्यांचं मत जाणून घ्यायचं असेल, तर कोणालातरी वरती जावं लागेल.''

Shivsena Shinde Group Vs Thackeray Group
Bajrang Punia: PM मोदींना पत्र लिहून बजरंग पुनियाने परत केला पद्मश्री पुरस्कार, पत्रात मांडलं दुःख...

हाच मुद्दा महाड येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना खटकला होता. यातच ठाकरे गटाने गोगावले यांचं निषेध करण्याची तयारी केली होती. यातच ठाकरे गटाचे कार्यकर्ते महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. त्यावेळी हा राडा झाला. तब्बल दीड तास हा राडा सुरु होता.

दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना धक्काबुकी करत होते. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती. यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Shivsena Shinde Group Vs Thackeray Group
Sunil Kedar News: ब्रेकिंग! नागपूर जिल्हा बँक घोटाळा: कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा

याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पुर्वसंधेला शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला होता. यावेळी ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com