Sunil Kedar News: ब्रेकिंग! नागपूर जिल्हा बँक घोटाळा: कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा

Sunil Kedar Sentenced In NDCCB Scam: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Sunil Kedar
Sunil KedarSaamtv
Published On

पराग ढोबळे, नागपूर|ता. २२ डिसेंबर २०२३

Nagpur District Bank Scam:

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रस नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुनिल केदार यांना कोर्टाने सर्वात मोठा धक्का दिला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी सुनील केदार यांना कोर्टाने साडे बारा लाखांच्या दंडासह पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

२००२ मध्ये झालेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणाचा निकाल आज (शुक्रवार, २२ डिसेंबर) सत्र न्यायालयात लागला. या प्रकरणात सुनील केदार यांच्यासह एकूण सहा जणांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या सहाही आरोपींना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने साडे १२ लाखांचा दंड आणि पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

आरोपींमध्ये  सुनील केदार (Sunil Kedar) यांच्यासह अशोक चौधरी, केतन सेठी, अमोल वर्मा, सुबोध भंडारी आणि नंदकिशोर त्रिवेदी यांच्या नावाचा समावेश आहे. तर महेंद्र अग्रवाल, ओमप्रकाश पोतदार, सुरेश पेशकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांची आमदारकीही जाण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sunil Kedar
Terrorist Pannun Threat: खलिस्तानी दहशतवादी पन्नूने दिली खासदार हेमंत पाटील यांना धमकी, 26 जानेवारीला स्फोट घडवून आणण्याची दर्पोक्ती

काय आहे नागपूर बँक घोटाळा?

२००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५० कोटींहून अधिक रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. यावेळी सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. मुंबई, कोलकाता आणि अहमदाबादच्या काही कंपन्यांनी बँकेच्या रकमेतून १२५ कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते.

त्यानंतर या कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही तसेच बँकेची रक्कमही परत केली नाही. सीआयडीचे तत्कालीन उपअधीक्षक किशोर बेले या घोटाळ्याचे तपास अधिकारी होते. तपास पूर्ण झाल्यावर २२ नोव्हेंबर २००२ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले गेले. तेव्हापासून खटला प्रलंबित होता (Latest Marathi News)

Sunil Kedar
Latur Breaking News: शालेय कार्यक्रमातील आसनव्यवस्था कोसळली, ४० हून अधिक विद्यार्थी जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com