Dombivli : विष्णुनगर पोलीसांनी केली दोन सराईत दुचाकी चोरांना अटक! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Dombivli : विष्णुनगर पोलीसांनी केली दोन सराईत दुचाकी चोरांना अटक!

चोरीच्या 9 मोटारसायकल हस्तगत..!

प्रदीप भणगे

डोंबिवली : विष्णुनगर पोलिसांनी दोन सराईत मोटारसायकल चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 9 मोटरसायकल (Two Wheeler) हस्तगत केल्या आहेत. दिलीप शांताराम पाटील (25) आणि रोहित अविनाश यादव (31) अशी अटक आरोपींची (Accused) नावे आहेत. डोंबिवली (Dombivli) पश्चिमेतील दीनदयाळ रोडवरून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना 4 नोव्हेंबरला घडली होती.

हे देखील पाहा :

याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले होते. यामध्ये दोन चोरटे मोटारसायकल ढकलून नेत असल्याचे दिसून आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांच्यासह पोलीस शिपाई भामरे, मिसाळ पोलीस हवालदार पाटणकर, पोलीस नाईक सांगळे, लोखंडे, कागूंने पथकाने त्या अनुषंगाने तपास करत चोरटा दिलीप याची माहिती मिळवली.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत त्याला जळगाव मधून अटक करण्यात आली. त्याच्याकडून त्याचा साथीदार रोहित याची माहिती घेत कल्याण पूर्व चिंचपाडा येथून अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या 9 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Historic Places : नर्मदा तटावरील राजेशाही वैभव, 'या' किल्ल्याचे रूपांतर झाले लग्जरी हॉटेलमध्ये, पर्यटकांची होते गर्दी

Bollywood Property: मलाइकाने अलिशान फ्लॅट दिला रेंटवर, इकडे सारा अन् माधुरीनं घर घेतलं भाड्याने, कितीची झाली उलाढाल?

Sonam Kapoor Baby Photo : बाळाला हातात घेताच सोनम कपूर भावुक, अनिल कपूरच्या नातवाची पाहा पहिली झलक

राज्य सरकारचा दिलासा! रेडी रेकनरच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा काय होणार फायदा?

Rule Change From Today: ATM लिमिट ते ट्रेडिंग; आजपासून ४ महत्त्वाचे नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT