PMPML Electric Buses  saamtv
मुंबई/पुणे

PMPMLच्या ताफ्यात येणार 1200 इलेक्ट्रिक बस; सुरक्षित प्रवासासाठी राबवणार 'झिरो ब्रेकडाऊन' पॉलिसी

PMPML Electric Buses : पीएमपीएमएलच्या ताफ्यात १२०० इलेक्ट्रिक बसेसची भर पडणार आहे. पुढील तीन महिन्यांत सर्व डिझेल बस हटवण्याची योजना असून पुणे शहर देशातील पहिले डिझेल-फ्री सार्वजनिक वाहतूक शहर होणार आहे.

Bharat Jadhav

  • पुण्याच्या रस्त्यावर धावणार डबल डेकर बस

  • पीएमपीएलमधील सीसीटीव्ही 24 तास चालणार

  • पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर डबल डेकर बस सेवा दिली जाणार

  • महिलेच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक असणार

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) आपल्या ताफ्यात आणखी बसेस वाढवणार आहे. डिझेलच्या बसेस कमी करण्याचे धोरण आखत पीएमपीएमएल आपल्या ताफ्यात पुढील सहा महिन्यात १२०० इलेक्ट्रिक बस येणार आहेत. पुढील तीन महिन्यात डिझेल बसेसची संख्या शून्यवर आणणार आहोत. डिझेल बस कमी करणारे पुणे हे पहिले पीएमपीएमएल शहर असेल, अशी माहिती पीएमपीएमएलचे सीएमडी पंकज देवरे यांनी दिलीय.

अपघाताचे वाढते प्रमाण पाहता दक्षता घेण्यात येणार आहे. बसेसमध्ये अत्यावश्यक सुधारणा करण्यात येणार आहे. त्यामुळे पीएमपीएमएलचा प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर होईल याचीही ग्वाही देवरे यांनी दिलीय.बसेसमध्ये सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी पीएमपीएलमधील सीसीटीव्ही २४ तास चालले पाहिजे, यासाठी सांगितले आहे.

बस डेपो मधून बाहेर जाईल त्यावेळी १५ चेकलिस्ट बसची केली जाईल. त्यानंतर जर ब्रेकडाऊन झाले तर, ब्रेक डाऊन कमी करण्यासाठी ड्रायव्हर आणि डेपो मेंटेनन्स इंजिनिअर यांना जबाबदार धरून त्याचे अर्ध्या दिवसाचे वेतन कपात करणार, त्यामुळे आपण आता झिरो ब्रेकडाऊन पॉलिसी राबवणार असल्याची माहितीही पंकज देवरे यांनी दिलीय.

पीएमपीएमएलकडे आधी दोन हजार बसेस आहेत. त्यात १२०० बसेस जोडण्यात आल्यातर पुणेकरांना सेवा चागल्या मिळतील. पुण्यात हायड्रोजन बस सुरू करण्याचा प्रयत्न प्रायोगिक तत्त्वावर होणार आहे. पीएमपीएलकडे सध्या सुस्थितीत २ हजार ५८ बस आहेत. यापैकी स्वमालकीच्या ८०५ भाडेतत्त्वावरील १ हजार २५३ बस पुणे शहरात पुणेकरांसाठी सुविधा देत आहेत. दरम्यान मगरपट्टा, हिंजवडी, खराडी इतर परिसरात रहदारी जास्त आहे.

तेथे प्रायोगिक तत्त्वावर डबल डेकर बस चालवण्यात येणार आहे. पर्यटन सेवा वाढवणार यासाठी आपली पीएमपीएम अँप सुरू केले जाणार आहे. पीएमपीएमएल तोट्यात आहे, त्यामुळे फुकट प्रवास करू नका. फुकट प्रवास करणाऱ्यांकडून ५०० ते १००० रुपयांचा दंड घेतला जातो. महिला सुरक्षेसाठी पीएमपीएल सीसीटीव्ही, दामिनी पथक यांच्या माध्यमातून सुरक्षा केली जाईल, असेही पंकज देवरे यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: आशियातील सर्वात मोठे गाव भारतात कोणत्या भागात आहे?

Raisin Price : चिनी बेदाण्याने मार्केट खाल्ले; महिन्याभरापासून बेदाणा दरात घसरण, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Maharashtra Live News Update: माधुरी हत्तीणीबाबत वनताऱ्याच्या अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची चर्चा

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदेंमध्ये वर्चस्वाची लढाई, एकाच पदासाठी दोघांकडून वेगवेगळ्या अधिकाऱ्याची नियुक्ती

Amruta Khanvilkar : अमृताने पटकावला पहिला राज्य चित्रपट पुरस्कार,'चंद्रमुखी'चं सर्वत्र होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT