PMPML Bus Google
मुंबई/पुणे

PMPML Bus: पीएमपी बसच्या फुकट्या प्रवाशांकडून 76 लाखांहून अधिक दंड वसूल, १५ हजार प्रवाशांचा विनातिकीट प्रवास

PMPML Bus: पीएमपीच्या महामंडळाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवून दंड आकारणी केली जाते, तरीही हा प्रकार कमी होत नाही.

Dhanshri Shintre

पुण्यात पीएमपी बसच्या फुकट्या प्रवाशांकडून 76 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. 10 महिन्यांत तब्बल 15 हजार प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केले. 1 जानेवारी ते 31ऑक्टोबर या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या 15 हजारवर गेली असल्याचे महामंडळाने जाहीर केले आहे. दररोज सरासरी 65 प्रवासी करतात विनातिकीट प्रवास करतं असल्याची माहिती समोर आली आहे.

पीएमपीकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना 50 ते 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही तिकीट काढले तपासणी वेळी ते हरवले तरी 500 रुपये दंड भरावा लागतो. सिग्नल तोडल्यास पीएमपी बस चालकांना बसणार १२०० रुपये दंड भरावा लागतो. दोन दिवसांत दोन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

पीएमपीच्या चालक आणि वाहकांबद्दलच्या तक्रारीचे प्रमाण वाढल्या आहेत. नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पीएमपी प्रशासनाच्या लक्षात आल्याने नियम मोडणाऱ्या चालक आणि वाहकांवर कारवाईचा बडगा उडाला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांना १२०० रुपये दंड भरावा लागणार असून, निलंबनाची कारवाई होण्याची ही शक्यता आहे. आत्तापर्यंत प्रवाशांच्या तक्रारीनुसार दोन कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पीएमपीकडून किफायतशीर दरात सेवा दिली जाते, मात्र तरीही काही प्रवासी नियमांकडे दुर्लक्ष करतात. महामंडळाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवून दंड आकारणी केली जाते, तरीही हा प्रकार कमी होत नाही. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि दंड टाळावा. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दररोज सरासरी ६५ ते ७० जण विनातिकीट प्रवास करतात, या आकडेवारीनुसार दररोज सरासरी २५ हजारांपेक्षा अधिक रुपयांची दंड वसूली पीएमपीकडून होत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemant Dhome: मराठी सक्ती विरोधातील आंदोलनावरून प्रसिद्ध अभिनेता भडकला; परप्रांतीय रिक्षाचालकांना दिला मोठा इशारा

Mansi Naik Dance Video: 'मेरे सपनो के राजा' गाण्यावर मानसी नाईकने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात मिळणार १० ते १६ लाखांचा एरियर

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट

Vande Bharat Train: मुंबईवरून बंगळुरूला जा सुसाट, वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार; मुंबईतून किती वाजता सुटणार अन् तिकीट किती?

SCROLL FOR NEXT