Pune PMPL Bus Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : एवढी मुजोरी! बस चालकाकडून मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Pune PMPL Bus News : पुण्यात पीएमपीएल बस चालकाने शुल्लक कारणावरून एका प्रवाशाला शिवीगाळ करत कानशिलात मारल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Alisha Khedekar

पुण्यात पीएमपीएल बस चालकाने प्रवाशाला थेट कानशिलात मारल्याची घटना समोर आली

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांचा संताप व्यक्त

शुल्लक कारणावरून हा वाद झाला आहे

चालकावर कारवाईची मागणी होत आहे

पुण्यात पीएमपीएल बस चालकाची मुजोरी पाहायला मिळाली आहे. पी एम पी बस चालकाने एका व्यक्तीला शिवीगाळ करत कानशिलात मारल्याची घटना घडली आहे. या घटनेचा विडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या चालकावर लवकरात लवकर कारवाईची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भेकराई नगर ते भोसरी या बसच्या बसचालकाने एका व्यक्तीला शुल्लक कारणावरून शिवीगाळ करण्यात केली. या वेळी दोघांमध्ये वाद झाले. या वादाचा भडका इतका वाढला की बस चालकाने थेट बस मधून उतरत या व्यक्तीला कानशिलात लगावली. या झटापटीत अज्ञात व्यक्तीचा चष्मा तुटला.

बस चालक येवढ्यावरच न थांबता त्याने अज्ञात व्यक्तीला मारहाण सुरूच ठेवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पी एम पी बस चालकाच्या विरोधात जोरदार टीका होत आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान नागरिकांनी या बसचालकावर कडक कारवाईची मागणी केली आहे. आता पीएमपीएल बस चालकाला शिक्षा होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

SCROLL FOR NEXT