राजेश टोपे - गणेश बिडकर - Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्याचा न्याय मुंबईकरांना लावला का ?- गणेश बिडकर यांचा टोपेंना सवाल

पुणे महापालिकेने सुधारित प्रस्ताव पाठवला तर पुणे शहराला मुख्यमंत्री निर्बंधांपासून दिलासा देऊ शकतात, असे टोपे यांनी 'साम टिव्ही'शी बोलताना सांगितले. त्यावर पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सवाल उपस्थित केला आहे

साम टिव्ही

पुणे : सध्या पुण्यामध्ये Pune लागू असलेल्या निर्बंधांबाबत Corona Restrictions आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी आणि मुख्य सचिवांशी चर्चा केली. पुणे महापालिकेने सुधारित प्रस्ताव पाठवला तर पुणे शहराला मुख्यमंत्री Chief Minister निर्बंधांपासून दिलासा देऊ शकतात, असे टोपे यांनी 'साम टिव्ही'शी Saam TV बोलताना सांगितले. त्यावर पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सवाल उपस्थित केला आहे. PMC Bjp Leader Ganesh Bidkar raises questions about restrictions

काही दिवसांपूर्वी राज्य सरकार कडून निर्बंधांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. २५ जिल्ह्यांत कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली. त्याचबरोबर ११ जिल्ह्यात निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले. या ११ जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे पुणे शहरात लेवल ३ चे निर्बंध लागू आहेत. यावरून पुण्याचे व्यापारी आक्रमक झाले आहेत. पुण्याच्या निर्बंधांबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, याच प्रश्नावर पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सवाल उपस्थित केले आहेत. मुंबईला 'खास' सवलत देताना असा प्रस्ताव कडून मागविण्यात आला होता का? असा सवाल त्यांनी केला आहे. PMC Bjp Leader Ganesh Bidkar raises questions about restrictions

बिडकर यांनी ट्विट करत राजेश टोपे यांना काही सवाल केले आहेत.

  • - मुंबईला 'खास' सवलत देताना असा प्रस्ताव मुंबई महानगर पालिकेकडून मागविण्यात आला होता का?

  • - पुणे महापालिकेला इतकी सापत्न वागणूक का?

  • - प्रस्ताव पाठवावा म्हणजे आम्ही आमच्या न्यायासाठी 'अर्ज' करायचा का?

  • - जर आम्ही प्रस्ताव पाठवलाच तर उद्धव ठाकरे आरोग्यमंत्र्यांचे ऐकतील का?

असे म्हणत #पुणेकरांनान्यायहवा ! असे गणेश बिडकर यांनी म्हटले आहे.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात?डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार?

SCROLL FOR NEXT