PM Narendra Modi in Mumbai SAAM TV
मुंबई/पुणे

PM Modi Mumbai Visit : नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या काही तास आधीच नाराजी उफाळली, कारण आलं समोर

PM Narendra Modi visit Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बुधवारी मुंबईत विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

PM Narendra Modi visit Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बुधवारी मुंबईत विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विकासकामांच्या श्रेयावरून शिंदे गट- भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, आता मोदींच्या दौऱ्याआधी विरोधकांची नाराजी समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईत आहेत. विविध विकासकामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीमध्ये मोदींची सभा आहे. या सभेसाठी प्रदेश भाजप आणि शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे. या मुंबई दौऱ्याआधीच आता विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

मोदींच्या दौऱ्याआधीच विरोधकांनी नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. मुंबईतील (Mumbai) विरोधी पक्षांचे खासदार आणि आमदारांची नावे निमंत्रण पत्रिकेवर नसल्याने ही नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी निमंत्रण द्यायला आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारला आहे.

मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला आलेल्या अधिकाऱ्यांना खासदार अरविंद सावंत यांनी धारेवर धरलं आहे. भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या खासदारांची नावे आहेत. मात्र, खासदार अरविंद सावंत यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नाव नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात अवकाळी पाऊस; पिकांना फटका

महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं; शेतकरी हवालदिल, पुढील ४८ तासांत २४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

4-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिनची ताकद, 4.1 सेकंदात 100 km/h वेग...; Audi SQ8 ची भारतात दमदार एंट्री, वाचा वैशिष्ट्ये

Breakfast Recipe : तांदूळ अन् उकडलेले बटाटे; १० मिनिटांत बनवा 'ही' कुरकुरीत रेसिपी, संध्याकाळी होईल पोटभर नाश्ता

Gashmeer Mahajani: गळ्यात कवड्याची माळ अन् कपाळाला मळवट; गश्मीर महाजनीचा नव्या अवतारातला थरारक 'गोंधळ'

SCROLL FOR NEXT