ठाकरे गटाचे आणखी आमदार, खासदार फुटणार? बड्या नेत्याच्या ‘मिशन टायगर’ विधानाने राजकारणात खळबळ

Ramdas Kadam Mission Tiger Latest News In Maharashtra: रामदास कदम यांनी ‘मिशन टायगर’ सुरू असल्याचे सूचक विधान करत ठाकरे गटावर निशाणा साधला. ठाकरे गटाचे आणखी आमदार, खासदार आणि नगरसेवक फुटण्याचे बोलले जात आहे.
Ramdas Kadam Slams Thackeray Camp Over 'Save Constitution' Campaign, Takes a Dig at Aaditya Thackeray
Ramdas Kadam Slams Thackeray Camp Over 'Save Constitution' Campaign, Takes a Dig at Aaditya Thackeraysaam tv
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही

संविधान बचावच्या नावाखाली गर्दी जमवून आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू आहे. मात्र, जनता अशा राजकारणाला बळी पडणार नाही, अशी जोरदार टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केली. एकीकडे संविधान वाचवण्याचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयावर टिप्पणी करून मोर्चे काढायचे, हा दुटप्पीपणा असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. त्याचवेळी ‘मिशन टायगर’ सुरू असल्याचे सूचक विधान करून ठाकरे गटातील आमदार आणि नगरसेवकांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा हवा दिली.

Ramdas Kadam Slams Thackeray Camp Over 'Save Constitution' Campaign, Takes a Dig at Aaditya Thackeray
Maharashtra Drought: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, विनाकारण सुट्टी घेतल्यास होणार फौजदारी कारवाई

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून संविधान बचावच्या मुद्द्यावरून गर्दी जमवली जात असल्याचा आरोप कदम यांनी केला. हा बालिशपणा असून, त्यातून पक्षाचे अपयश झाकले जाणार नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडले असताना त्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी राजकारण केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे सांगत मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. शिवसैनिक आणि पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा उपक्रम हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारणाच्या विचारांची अंमलबजावणी असल्याचेही कदम म्हणाले.

Ramdas Kadam Slams Thackeray Camp Over 'Save Constitution' Campaign, Takes a Dig at Aaditya Thackeray
नागपूर ते गोवा प्रवास सुपरफास्ट! 8 तासांत पोहोचणार समुद्राच्या किनारी; 13 जिल्ह्यातून जाणार महामार्ग

‘मिशन टायगर’बाबत सूचक विधान

दरम्यान, ठाकरे गटातील नेते, आमदार आणि नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी ‘मिशन टायगर’ सुरू असल्याचा दावा केला. याबाबत आत्ताच सविस्तर बोलणे योग्य ठरणार नाही. योग्य वेळी योग्य तो निर्णय होईल. आता सर्व काही सांगितले, तर सगळी मजा निघून जाईल, असे सूचक विधान त्यांनी केले. ठाकरे गटातील आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख आणि नगरसेवक पक्ष सोडत असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटाला आणखी राजकीय धक्के बसणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Ramdas Kadam Slams Thackeray Camp Over 'Save Constitution' Campaign, Takes a Dig at Aaditya Thackeray
Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

संजय राऊत यांच्यावरही टीकेची झोड

संजय राऊत यांच्याबाबत बोलताना कदम यांनी त्यांना गांभीर्याने घेत नसल्याचे सांगितले. राऊत यांच्याबद्दल आपण कधीही बोललो नसल्याचे स्पष्ट करत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोलून प्रसिद्धी मिळवणे हाच त्यांचा उपक्रम असल्याची टीका त्यांनी केली. त्यांच्यावर बोलण्यापेक्षा दुर्लक्ष केलेले चांगले, असेही कदम म्हणाले. सर्वोच्च न्यायालयावर टिप्पणी करणे आणि न्यायालयाच्या विरोधात मोर्चे काढणे देशाच्या इतिहासात अभूतपूर्व असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एकीकडे संविधान बचावचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न करायचा, हा दुटप्पीपणा असून तो निषेधार्ह असल्याचे कदम यांनी म्हटले.

तेजस ठाकरेंना राजकारणात येण्याचे निमंत्रण; आदित्य ठाकरेंना टोला

याचवेळी तेजस ठाकरे यांनी राजकारणात सक्रिय व्हावे आणि पुढे जावे, अशा शुभेच्छा कदम यांनी दिल्या. तेजस यांनी राजकारणात यावे, त्यांनी खूप पुढे जावे; मात्र आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे नाव खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी दिला. आदित्य आणि तेजस हे आपल्याला मुलांसारखे असल्याचे सांगत दोघांनीही जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करावे, असे ते म्हणाले. जनतेची सेवा केल्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मिळतील, असेही कदम यांनी नमूद केले. संविधान बचावच्या मुद्द्यावरून ठाकरे गटावर टीका, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारणाला विरोध, संजय राऊत यांच्यावर निशाणा आणि ‘मिशन टायगर’बाबतचे सूचक विधान, अशा विविध मुद्द्यांवरून रामदास कदम यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले. त्यांच्या विधानांमुळे शिवसेनेतील दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com