Alisha Khedekar
SSR म्हणजे Special Summary Revision अर्थात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण. ही मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया आहे.
मतदानासाठी पात्र झालेल्या नागरिकांना मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी मिळते.
मतदारांच्या नावात, पत्त्यात किंवा इतर तपशीलांत असलेल्या चुका दुरुस्त करता येतात.
मृत मतदारांची आणि कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची नावे नियमानुसार यादीतून वगळली जातात.
या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील नोंदी अधिक अचूक आणि अद्ययावत ठेवण्यास मदत होते.
SSR २०२६ ची पहिली प्रारूप यादी प्रसिद्ध होणार. या यादीनंतर दुरुस्ती करून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल
अंतिम यादी २ ते ३ महिन्यांनी दुरुस्ती करून प्रसिद्ध केली जाते. यामध्ये मतदारांची नाव, पत्ता यांसारखी महती तपासून ती प्रसिद्ध केली जाते.